जाहिरात

Kalyan News: कल्याणच्या 'या' भागात बिल्डरांचं अतिक्रमण, संतापलेले नागरिक KDMC मध्ये म्हैस घेऊन धडकले, Video

तक्रारदार नागरिकांनी थेट म्हैस घेऊन केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात धडक देत प्रशासनाला निवेदन दिले. नागरिक महापालिकेविरोधात म्हैस घेऊन रस्त्यावर उतरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kalyan News: कल्याणच्या 'या' भागात बिल्डरांचं अतिक्रमण, संतापलेले नागरिक KDMC मध्ये म्हैस घेऊन धडकले, Video
Kalyan Buffalo Strike Video Viral
मुंबई:

Kalyan News Today : कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर भूमाफिया आणि बिल्डरांनी अतिक्रमण केलं आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं केडीएमसी आय प्रभाग कार्यालयात अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. तक्रारदार नागरिकांनी थेट म्हैस घेऊन केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात धडक देत प्रशासनाला निवेदन दिले. नागरिक महापालिकेविरोधात म्हैस घेऊन रस्त्यावर उतरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमाफिया आणि बिल्डरांनी जवळपास 70 ते 80 अनधिकृत चाळी उभारल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे गुरे चारण्यासाठी असलेली मोकळी जागा पूर्णपणे नष्ट झाल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. गुरचरण जागा अतिक्रमणामुळे संपली असून आता गुरांना चारण्यासाठी जागाच उरलेली नाही.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या या हायप्रोफाईल सोसायटीत राडा, थकीत मेन्टनन्समुळे बाप-लेकाने चेअरमनला दांडक्याने मारलं

"अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा"

त्यामुळेच प्रशासनाला वास्तव दाखवण्यासाठी म्हैस घेऊन आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे,असे आंदोलकांनी म्हटलं आहे.संबंधित अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून ती जमीन मोकळी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. न्यथा येत्या काळात सर्व गुरे घेऊन थेट पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर सोडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com