जाहिरात

Kalyan News: कल्याणच्या या हायप्रोफाईल सोसायटीत राडा, थकीत मेन्टनन्समुळे बाप-लेकाने चेअरमनला दांडक्याने मारलं

सोसायटीच्या थकीत मेन्टेनन्सच्या कारणावरून बाप लेकाने सोसायटीच्या चेअरमनला मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेतील माणेरे गावात घडली आहे.

Kalyan News: कल्याणच्या या हायप्रोफाईल सोसायटीत राडा, थकीत मेन्टनन्समुळे बाप-लेकाने चेअरमनला दांडक्याने मारलं
Kalyan Crime News Today
मुंबई:

Kalyan Crime News Today : सोसायटीच्या थकीत मेन्टेनन्सच्या कारणावरून बाप लेकाने सोसायटीच्या चेअरमनला मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेतील माणेरे गावात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीतील मारहाणीच्या या घटनेमुळं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील माणेरे गावात वैष्णवी सुमन रेसिडेन्सी आहे. या रेसिडेन्सीत राहणारे दत्तात्रय निकम हे सोसायटीचे चेअरमन आहेत. सोसायटीत राहणारे साईनाथ  राठोड यांच्याकडे 2025 वर्षाचा मेंटेनन्स थकीत असल्याची माहिती दत्तात्रय यांनी सोसायटीचे सदस्य तुषार वांद्रे याना दिली होती. 7 मार्च रोजी दत्तात्रय यांनी साईनाथ राठोड यांच्याकडे थकीत मेन्टेनन्स मागितला होता.त्यानंतर साईनाथला याचा राग आला. त्याने दत्तात्रय यांच्या घरासमोर येऊन त्यांना शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

नक्की वाचा >> Ind vs Nz : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यात पाऊस पडणार का? अहमदाबादमध्ये काय आहे हवामानाची स्थिती? जाणून घ्या

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

हा वाद सुरु असताना साईनाथ यांचा मुलगा त्याठिकाणी आला.'माझ्या बापाशी वाद का घालतो', असं विचारत आरोपींनी दत्तात्रय यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत दत्तात्रय यांना गंभीर दुखापत झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश बागुल यांनी दत्तात्रय यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांनी या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com