Cabinet Decision: मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरकरांसाठी खूशखबर! मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-लोकलसाठी मोठे निर्णय

Cabinet Decision : सरकारच्या या निर्णयांमध्ये केवळ मेट्रो आणि रेल्वेच नाही, तर रस्ते आणि व्यावसायिक केंद्रांच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Cabinet Dicision : राज्य मंत्रिमंडळाने मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये मेट्रो प्रकल्पांना गती देणे, उपनगरीय रेल्वे सेवांचा विस्तार करणे आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. या निर्णयामुळे भविष्यात या महानगरांमधील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्यास मदत होईल. सरकारच्या या निर्णयांमध्ये केवळ मेट्रो आणि रेल्वेच नाही, तर रस्ते आणि व्यावसायिक केंद्रांच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

मेट्रो प्रकल्पांना गती

मुंबई : मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका-11 प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 23,487.51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' १४ मोठे निर्णय)

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणासाठी बाह्य कर्जाला मान्यता देण्यात आली आहे.

पुण्यातील नवीन स्थानके : पुणे मेट्रोवरील स्वारगेट ते कात्रज मार्गावर बालाजीनगरआणि बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी 683.11 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कात्रज मेट्रो स्थानक 421 मीटरने दक्षिणेकडे स्थलांतरित करण्यासही मान्यता मिळाली आहे.

Advertisement

ठाणे : ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी कर्जाला मान्यता देण्यात आली आहे.

नागपूर: नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या कर्जालाही मान्यता मिळाली आहे.

उपनगरीय रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास

मुंबई लोकल: मुंबईतील शहरी परिवहन प्रकल्प टप्पा-3 आणि टप्पा-3अ मधील लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी राज्य सरकार 50% आर्थिक भार उचलणार आहे.

(Manoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, 'या' मागण्यांवर झाली सहमती, वाचा सविस्तर)

पुणे-लोणावळा लोकल: पुणे ते लोणावळा लोकल रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका प्रकल्पाचा खर्च मुंबईच्या धर्तीवर राज्य सरकार उचलणार आहे.

ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग : ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग सार्वजनिक-खाजगी-भागीदारी तत्त्वावर राबवला जाणार आहे.

नागपूर शहराचा कायापालट

नागपूरमध्ये 692.06 हेक्टर जागेवर 'इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर' नावाचे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळाली आहे. नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता आणि त्याच्या लगत 4 वाहतूक बेटांची निर्मिती केली जाणार आहे.

Advertisement

Topics mentioned in this article