राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यात महिला पोलीस अधिकारी आणि तिच्य सहकाऱ्यांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी गाडी चालवल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र चिडलेल्या कार चालकाने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय साळवे याला अटक केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अशा चालकांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. अशाच एका कारवाई दरम्यान ही घटना घडली आहे.
(नक्की वाचा- नियमांचे पालन करा...पळून जाऊ नका! पुण्यातल्या बिल्डरपुत्रानं 2 महिन्यांनी लिहिला 300 शब्दांचा निबंध)
विश्रामबाग पोलिसांनी वाहनांची तपासणी आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी चौकी उभारण्यात आली आहेत. दरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांनी एका मद्यधुंद वाहन चालकाला अडवले. यावेळी कार चालकांना पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांसोबत झालेल्या वादादरम्यान रागाच्या भरात चालकाने अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लायटर चुकीच्या पद्धतीने धरल्याने तो पेटला नाही. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी त्वरित चालकाला ताब्यात घेतले.
नक्की वाचा- BMC च्या गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल, रवींद्र वायकरांना क्लीन चीट
नेमके काय झाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साळवे दारु पिऊन गाडी चालवत असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली. मात्र कारवाई करु नये यासाठी त्यांने जबरदस्तीने पोलिसांच्या हातातील मशिन ओढून घेतले. मात्र पोलिसांच्या राग मनात धरुन आरोपीने सहायक पोलीस निरीक्षक जानकर यांच्या अंगावर आणि स्वत:च्याही अंगावर पेट्रोल टालेले. लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र लायटर उलटा पकडला असल्याने आग पेटली नाही.