ठाकरे गटाच्या नेत्याची तोतयागिरी?, 'त्या' पत्रामुळे अडचण वाढण्याची शक्यता

अशोक स्तंभाची मुद्रा वापरण्याचे काही नियम आहे. त्यात माजी आमदार व माजी खासदार यांनी ती मुद्रा वापरण्याचा कुठेही  उल्लेख नाही. सहा वर्षे आमदार राहिलेल्या माणसाला हे कळू नये, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

Advertisement
Read Time: 2 mins

निलेश वाघ, नाशिक

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नरेंद्र दराडे यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नरेंद्र दराडे यांचा विधानपरिषद आमदारकीचा कार्यकाळ संपलेला असताना देखील त्यांना आमदार म्हणून पत्रव्यवहार केल्याचं समोर आलं आहे.  

नरेंद्र दराडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला येवला येथील शिवसृष्टीच्या कामाची अद्यावत माहितीसाठी पत्रव्यवहार केला होता. लेटरहेडवर विधानसभेचे प्रतिक, राष्ट्रीय चिन्ह आणि विधानपरिषद सदस्य असा उल्लेख आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसेवक नसताना देखील तोतयागिरी केली म्हणून अंबादास खैरे यांनी तक्रार दाखल केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अंबादास खैरे हे छगन भुजबळांचे विश्वासू याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहे. 

(नक्की वाचा- सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; वडेट्टीवारांनी सांगितलं मुख्यमंत्री कुणाचा होणार )

छगन भुजबळांचा आरोप 

छगन भुजबळ यांना नरेंद्र दराडे यांच्या निशाणा साधत म्हटलं की, दराडे यांनी दिलेले पत्र मला प्राप्त झाले आहे. वास्तविक त्यांची मुदत संपल्यावरही विद्यमान आमदार म्हणून पत्र देणे अयोग्य आहे. दराडे यांनी आमदार म्हणून सही देखील केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तोतया आमदार म्हणून गुन्हा दाखल होईलच, पोलीस अधिक तपास करतील. अशोक स्तंभाची मुद्रा वापरण्याचे काही नियम आहे. त्यात माजी आमदार व माजी खासदार यांनी ती मुद्रा वापरण्याचा कुठेही  उल्लेख नाही. सहा वर्षे आमदार राहिलेल्या माणसाला हे कळू नये, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

(नक्की वाचा-  'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा )

नरेंद्र दराडे यांच्या कार्यालयाचं प्रत्युत्तर 

नरेंद्र दराडे बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र सदरचे पत्र माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे नाही. त्यांनी तसे पत्रही दिले नाही. जनतेच्या कामासाठी दराडे यांनी आमदार असताना काही कार्यकर्त्यांना तसे पत्र दिलेले असते. त्यापैकी  कोणी एका कार्यकर्त्याने  तसे पत्र दिले असावे. त्यावरील सही देखील माजी आमदार नरेंद्र दराडे यांची नाही. फॉरेन्सिक लॅबमध्ये चौकशी केली तरी सत्य बाहेर येईल. विधानसभा निवडणुकीच्या निमिताने केवळ राजकारणासाठी असे आरोप केले जात आहे, असं नरेंद्र दराडे यांचे कार्यालय प्रमुख प्रमोद बोडके यांनी केला आहे.
 

Topics mentioned in this article