
Central Railway Power Block Megablock : कर्जत रेल्वे यार्ड सुधारणेच्या कामासाठी मध्य रेल्वेने चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कर्जत यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी अनेक ठिकाणी लोकल सेवेत बदल करण्यात आले आहेत. यानुसार 18, 22, 23 आणि 24 सप्टेंबरला विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणाम कर्जत, खोपोली, नेरळ लोकल सेवेवर याचा परिणाम होणार आहे.
विषेश म्हणजे कर्जहून खोपोलीला दुपारी १२ आणि १.१५ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर खोपोलीहून कर्जतला ११.२० आणि १२.४० वाजता सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.
१८ सप्टेंबर
सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ब्लॉक
नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल बंद
नक्की वाचा - Mumbai Metro 3 Aqua Line: आरे ते कफ परेड मेट्रोचं तिकीट किती? अवघ्या एका तासात करा प्रवास
परिणाम
१ कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस सकाळी ११.३० ते दुपारी १.०५ पर्यंत लोणावळा येथे थांबवणार
२ चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस आणि चेन्नई-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस थांबवू दुपारी १.१० नंतर लोणावळ्यातून मार्गस्थ
३ CSMT हून सकाळी ९.३० ते सकाळी ११.१४ पर्यंत कर्जतला जाणाऱ्या लोकल नेरळपर्यंत
४ सकाळी ११.१९ ते दुपारी १ वाजेपर्यंत CSMT साठी सुटणारी लोकल कर्जत-खोपोलीऐवजदी नेरळ येथून सुटतील
२२ सप्टेंबर
दुपारी १२.२५ ते दुपारी १.५५ वाजेपर्यंत कर्जत ते खोपोलीदरम्यान ब्लॉक
२३ सप्टेंबर
सकाळी ११.२० ते दुपारी १.५० दरम्यान नेरळ ते खोपोलीदरम्यान ब्लॉक
परिणाम
या कालावधीत नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द
२४ सप्टेंबर
सकाळी ११.२० ते दुपारी १.२० आणि दुपारी १.२० ते दुपारी ३.२० पर्यंत अप, डाऊन आणि मध्य मार्गावर ब्लॉक
परिणाम
नेरळ ते खोपोली स्थानकादरम्यान सर्व लोकल रद्द
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world