Mumbai Pune Heavy Rain : 14 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3 तास मुंबई, उपनगर, रायगड, सोलापूर, ठाणे येथे ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Rain Update : दादर स्थानकापूर्वी रेल्वे ट्रॅकवर साचलं पाणी
Rain Update : नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं..
नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं..
Rain Update : मुंबईतील पावसामुळे मोनो खोळंबली
Rain Update : मुंबई पावसामुळे मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड
मुंबई पावसामुळे मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड
तब्बल एक तासभर मोनोरेल एकाच जागेवर उभी होती. तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल बंद झाली होती. यानंतर प्रवाशांना त्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यामधून १७ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे.
Rain Update : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढील 3 तास धोक्याचे
Maharashtra | Red Alert issued for Mumbai, Thane and Raigad for 3 hours. Intense to very intense spells of rain and thunderstorm accompanied with lightning with gusty winds reaching 30-40 kmph very likely: IMD Mumbai pic.twitter.com/h6R0uOfaRq
— ANI (@ANI) September 15, 2025
Rain Update : हवामान विभागाकडून मुंबईला रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) ने आज मुंबई के लिए रेड अलर्ट जारी किया है। मुंबई के कुछ हिस्सों में कल रात से भारी बारिश हो रही है। pic.twitter.com/EDsisMwZed
— ANI_HindiNews (@AHindinews) September 15, 2025
Rain Update : रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट
गेले काही दिवस पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं.. पण काल संध्याकाळपासून पावसाने पुन्हा पुनरागमन केलं आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री पावसाची संततधार सुरू होती. पण आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. सध्या ढगाळ वातावरण जिल्ह्यात आहे.. दरम्यान आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 27.05 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. मंडणगड, रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमध्ये 30 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे..
Rain Update : मुंबईत मुसळधार पावसामुळे मोनो रेल बंद
मुंबईत मुसळधार पावसामुळे मोनो रेल झाली बंद, वडाळा परिसरात मोनो रेल बंद
Live Update : आज मुंबईत तुफान पावसाची शक्यता
South Mumbai has crossed 150 mm in last 24 hours. That almost very heavy rains 🟠
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) September 15, 2025
More such showers will be there next 24-36 hours over Mumbai. Tonight looks CRUCIAL, as already said Sunday-Monday to peak for #MumbaiRains. Thanks all for trusting forecasts 🙏 https://t.co/81nCvodgHR
Rain Update : खडकवासला धरणातून आज सकाळी ६ वाजता १८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरणातून आज सकाळी ६ वाजता १८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे. सध्या खडकवासला धरण पूर्ण भरले असून, त्यातून सुमारे १८०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, पानशेत धरणातून १३०० क्युसेकने आणि वरसगाव धरणातून १०८८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे, मुठा नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना नदीकाठच्या भागात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीपात्रात किंवा नदीकाठच्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांना आणि पुलांजवळील रहिवाशांना सुरक्षित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या गावांतून पाणी जाणार आहे, त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
Rain Update : खार सबवेजवळ अर्धा फूट पाणी साचलं, वाहतूक मंद गतीने
खार सबवे (वाकोला) या ठिकाणी अर्धा फूट पाणी साठलेले आहे आणि पानबाई स्कुल नॉर्थ बाउंड स्लिप रोड या ठिकाणी एक फूट पाणी साठलेले असल्याने वाहतूक मंद गतीने चालू आहे. #MTPTrafficUpdate
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 15, 2025
Rain Update : कुर्ला स्थानकाजवळ पाणी साचल्याची माहिती
कुर्ला स्थानकाजवळ पाणी साचल्याची माहिती
रविवारी रात्रीपासून मुंबईत तुफान पाऊस सुरू झाला असून याचा परिणाम लोकल सेवेवर होत असल्याचं दिसून येत आहे.
Rain Update : मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
स्थानिक शाळाने निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
पुण्यात रात्रीपासून सुरू आहे मुसळधार पाऊस या पावसामुळे शाळांना सुट्टी.
Rain Update : मुंबई शहर, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, बीड, पुणे भागात ऑरेंज अलर्ट
मुंबई शहर, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, बीड, पुणे भागात ऑरेंज अलर्ट
पुढील तीन तासात वारासह मुसळधार पाऊस अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे
Rain Update : अकोल्यात मुसळधार पावसाची हजेरी !
अकोला शहरासह ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मोठी उमरी, गुडधी, यावलखेड, सांगळूद, बाबुळगाव, बोरगावसह परिसराला पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे हॉटेल विक्रेत्यांसह अकोलेकरांची चांगलीच धावपळ उडाली. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, अकोला जिल्ह्यात पुढील ३ दिवसांचा येलो अलर्ट दिला असून, आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत, शहरासह ग्रामीण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain Update : पोलादपुर महाबळेश्वर रस्त्यावर दरड
पोलादपुर महाबळेश्वर रस्त्यावर रात्री उशीरा दरड कोसळली. आंबेनळी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कापडे गाव हद्दीत हि दरड कोसळली असून यामुळे काहीकाळ रस्ता बंद ठेवण्यात आला होता. प्रशासनाने तात्काळ JCB आणि मनुष्य बळाचा वापर करीत रस्त्यावरील दगड माती हटवून मार्ग मोकळा केला. योग्य ती काळजी घेऊन पोलादपुर महाबळेश्वर रस्त्याचा वापर करण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Rain Update : जोरदार पडलेल्या पावसानंतर सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ
विवारी सायंकाळी दक्षिण रायगडला जोरदार पावसाने झोडपले. याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपुरला बसला. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने महाड शहर चांभारखिंड परिसरात, मुंबई गोवा महामार्गालगत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तर महाबळेश्वर परीसरा झालेल्या जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली असून पोलादपुरमधील सावित्री नदी लगतच्या परिसरात रस्त्यावर रात्री उशिरा पर्यंत पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
Rain Update : पुण्याच्या इंदापूर तालुक्यात गेल्या 24 तासाहून अधिक काळ पाऊस सुरू
पुण्याच्या इंदापुर तालुका आणि शहरात गेल्या दोन दिवसापासून मोठा पाऊस कोसळतोय. परवा पासून पावसाची सुरू झालेली संततधार अद्यापही थांबली नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने इंदापूर शहरातील पाणदरा नाला तुडूंब भरून वाहिला गेला. या पाण्यामुळे शहरातील पाणदरा,कासारपट्टा परिसरात काहीशा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं आहे.
मात्र गेल्या 24 तासात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला गेलाय. गेल्या दोन दिवसापासून हा पाऊस सुरू असून आज सकाळपासून देखील मेघ दाटून आलेले आहेत आणि पावसाची संततदार सुरूच आहे त्यामुळे आज दिवसभर देखील हा पाऊस सुरूच राहील असा अंदाज आहे.
Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसत आहे. विशेष म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात दोन दिवसांत एकूण ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, याचा सुमारे ६४० गावांना फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात तर पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अनेक गावांत शेकडो एकर जमिनी पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाचा जोर पाहता जायकवाडी धरणाचे देखील संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले होते, त्यामुळे गोदावरीला देखील मोठा पूर आला. तर पुढील २ दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह परभणी, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली व जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
Rain Update : अंधेरी सबवे येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद
अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथील वाहतूक गोखले ब्रीज मार्गे वळविण्यात आली आहे.#MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 15, 2025
Rain Update : हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
स्थानिक शाळाने निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
पुण्यात रात्रीपासून सुरू आहे मुसळधार पाऊस या पावसामुळे शाळांना सुट्टी.
Rain Update : हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
स्थानिक शाळाने निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
पुण्यात रात्रीपासून सुरू आहे मुसळधार पाऊस या पावसामुळे शाळांना सुट्टी.
Rain Update : मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिराने
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा उशिराने धावत आहे
पावसाचा थेट परिणाम मुंबईतील रेल्वे सेवेवर
मध्य रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिरा तर हार्बर लाईन सुद्धा ७ ते १० मिनिटं उशिरा धावतेय
पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेवर सुद्धा पश्चिम रेल्वे ५ मिनिटं उशिराने धावत आहे
सकाळच्या सत्रात पावसामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे पावसामुळे हाल