मध्य रेल्वेवर 5 ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक, काय आहेत बदल?

मध्य रेल्वेवर वेळापत्रकाची पाच ऑक्टोबरपासून अंमलबजावणी केली जाईल. तर पश्चिम रेल्वेवर 12 ऑक्टोबरपासून हे वेळापत्रक लागू होईल.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार लोकस सेवा असणार आहे. या वेळापत्रकाची मध्य रेल्वेवर पाच ऑक्टोबरपासून अंमलबजावणी केली जाईल. तर पश्चिम रेल्वेवर 12 ऑक्टोबरपासून हे वेळापत्रक लागू होईल. या नव्या वेळापत्रकामुळे दादर स्थानकावरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

नव्या वेळा पत्रकानुसार सीएसएमटी वरून कर्जतला शेवटची लोकल सुटेल. ही लोकल  मध्यरात्री 12.12 मिनिटांनी सीएसएमटीवरून सुटेल. तर कसाऱ्यासाठी  सीएसएमटी वरून शेवटची लोकल मध्यरात्री 12.08 वाजता सुटणार आहे. मध्य रेल्वेवर नव्या वेळापत्रकानुसार 24 लोकलचा परळपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. तर 11 लोकल सीएसएमटी ऐवजी दादरहून धावणार आहेत. सहा लोकल ठाण्याऐवजी कल्याणपर्यंत धावणार आहेत. या बदलाचा फायदा थेट उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना होईल. शिवाय गर्दीही कमी होईल.  

ट्रेंडिंग बातमी - एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह! मुलींच्या सुरक्षेसाठी काय आहे पंचशक्ती अभियान?

पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेवर 12 नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. 10 लोकल फेऱ्यांसाठी बाराऐवजी पंधरा डब्यांच्या गाड्या वापरल्या जाणार आहेत. त्याच बरोबर बारा डब्यांच्या सहा लोकलचा विस्तार केला जाईल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरही मोठ्या प्रमाणात ताण आहे. शिवाय गर्दीही वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - पुण्यात चाललंय काय? धावत्या स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार, तर बापानेच लेकीवर केला...

मध्य रेल्वेने एकूण 78 लोकलच्या वेळात बदल केला आहे. सीएसएमटीवरून जवळपास  254 जलद लोकल धावतात. पण पुरेसे फलाट नसल्यामुळे या लोकल विलंबाने धावत असतात. त्यात लोकलमध्ये जागा मिळावी म्हणून अनेक जण उलट दिशेचा प्रवास करत लोकल पकडतात. या सर्व गोष्टींचा विचार करता मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल असा दावा मध्य रेल्वेचा आहे.