मुली आणि महिलांवर होणारे अत्याचार कमी होत नाहीत. त्यात वाढ होत आहे. अशा स्थितीत हे गुन्हे रोखण्यासाठी एक रामबाण उपाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोधला आहे. याची अंमलबजावणी बारामतीत केली जाणार आहे. हे आहे पंचशक्ती अभियान. या अभियानाच्या माध्यमातून शक्ती बॉक्स ,शक्ती नंबर, शक्ती भेट, शक्ती कक्ष आणि शक्ती नजर हे उपक्रम राबले जाणार आहेत. या माध्यमातून महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी अभियान राबवले जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
बारामतीतल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. या घटना टाळाव्यात यासाठी त्यांनी काही उपाययोजना राबवण्याच्या ठरविल्या आहेत. यानुसार शहरात शक्ती अभियान सुरु केले जाणार आहे. या अभियानात पंचशक्ती दिसून येणार आहे. ही पंचशक्ती म्हणजे क्ती बॉक्स ,शक्ती नंबर, शक्ती भेट, शक्ती कक्ष आणि शक्ती नजर हे असेल. या माध्यमातून मुलींना आणि महिलांना आपल्या तक्रारी सांगता येणार आहेत. शिवाय यावर पोलिसांना तात्काळ कारवाईही करायची आहे अशी माहिती पवार यांनी दिली.
काय आहे शक्ती बॉक्स?
शक्ती बॉक्स हे बारामती शहरातल्या एसटी स्टँड, कोचिंग सेंटर, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी लावण्यात येणार आहे. ही एक तक्रार पेटी असेल. या माध्यमातून मुलींना आपल्या तक्रारी यात टाकता येतील. शिवाय गांजा, गुटखा किंवा अवैध गोष्टींची तक्रारही त्यांना यातून करता येतील. ज्याने ही तक्रार केली आहे त्याचे नाव हे गोपनिय ठेवण्यात येईल. या संकल्पनेतून ज्या मुली आणि महिला पुढे येवून तक्रारी करू शकत नाही त्यांना मदत होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'अजित पवारांनी भ्रष्टाचारी वृत्तीची पिढी तयार केली' दादांचा खंदा समर्थक भडकला
महिलांसाठी शक्ती नंबर
एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह ही या मागची संकल्पना आहे. त्यासाठी शक्ती नंबर देण्यात आला आहे. तो शक्ती नंबर 9209394917 असा आहे. या क्रमांकाची सेवा 24/7 सुरू असेल. या शक्ती नंबरवर ही तक्रार करता येऊ शकेल.तक्रार केल्यानंतर तातडीने कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल अशा वेळी या क्रमांकावर तातडीने संपर्क करता येईल. त्यानंतर मदतही त्याच वेगाने पोहोचवली जाईल.
सर्वांवर असणार 'शक्ती नजर'
तरुण आणि तरुणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे ते सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करत आहेत त्यावर नजर ठेवण्यासाठी शक्ती नजर असेल. या माध्यमातून फेसबुकवर केल्या जाणाऱ्या पोस्ट, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस यावर लक्ष ठेवलं जाईल. अनेक वेळा सोशल मीडियावर शस्त्र, बंदूक, पिस्तूल, चाकू अशा पोस्ट टाकल्या जातात. त्यावर शक्ती नजर समाजातून लक्ष ठेवेल. शिवाय कारवाईचाही बडगा उगारेल.
ट्रेंडिंग बातमी - अंगावर दूध येत नाही म्हणून 5 महिन्याच्या बाळासह डॉक्टर आईचं टोकाचं पाऊल
मुलींसाठी शक्ती भेट
शक्ती भेटच्या माध्यमातून शाळा, कॉलेज, सर्व शासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या, रुग्णालय, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला होस्टेल या ठिकाणी भेटी दिल्या जातील. तिथे असलेल्या महिला मुलींना महिलांचे कायदे, गुड टच, बॅड टच, याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. वाढती गुन्हेगारी या संदर्भात ही मार्गदर्शन केले जाईल. महिला- मुलींमध्ये जागरूकता निर्माण केले जाईल. त्यासाठी शक्ती भेट ही संकल्पना साकारली जाईल.
ट्रेंडिंग न्यूज - LIVE UPDATE: बदलापूर प्रकरणातील अटक संचालकांना कोर्टात हजर करणार
शक्ती कक्ष ही असेल मदतीला
बारामती पोलिस उपविभागीय कार्यालय आणि पोलिस स्थानकात आता शक्ती कक्ष उघडले जातील. तिथे महिलांच्या मदतीसाठी महिला पोलिस असतील. शिवाय कायद्याचेही ज्ञान या कक्षाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. किशोरवयीन मुलं -मुलींना गुन्हेगारी व व्यसनांपासून परावर्तन करण्याचं काम ही केलं जाणार आहे. अजित पवारांनी याबाबत तातडीचे बैठक घेत या पंचशक्तीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यात मदत होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world