जाहिरात

पुण्यात चाललंय काय? धावत्या स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार, तर बापानेच लेकीवर केला...

पुण्याच्या वानवडीत एका स्कूल व्हॅनमध्ये, व्हॅन चालकाने गाडीतल्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. धावत्या व्हॅनमध्येच त्याने हे अत्याचार केले.

पुण्यात चाललंय काय? धावत्या स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार, तर बापानेच लेकीवर केला...
पुणे:

लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होतानाच दिसत आहे. पुण्यातून अशाच दोन हादरवून टाकणाऱ्या घटना घडल्या आहे. पुण्याच्या वानवडीत  एका  स्कूल व्हॅनमध्ये, व्हॅन चालकाने गाडीतल्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. धावत्या व्हॅनमध्येच त्याने हे अत्याचार केले. गेल्या चार दिवसापासून हा भयंकर प्रकार सुरू होता. तर दुसऱ्या घटनेत बापाच आपल्या पोटच्या लेकीवर गेल्या वर्षा भरापासून लैंगिक अत्याचार करत होता. या दोन्ही घटनानंतर पुण्यात नक्की चाललंय तरी काय असा  प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

वानवडी परिसरात स्कूल व्हॅन चालक गाडीत असलेल्या दोन चिमुरडींवर गेल्या चार दिवसापासून अत्याचार करत होता. या दोघीही सहा वर्षाच्या होत्या. आरोपी व्हॅन चालक हा नामांकीत शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याचे काम करत होता. आरोपी हा दोन्ही मुलींनी आपल्या बाजूच्या सीटवर नेहमी बसायला सांगत असत. त्यानंतर त्या दोघीं बरोबरही अश्लील चाळे करत असत. याबाबत कोणाला सांगितले तर मारण्याचीही धमकी त्याने दिली होती.  

ट्रेंडिंग बातमी - एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह! मुलींच्या सुरक्षेसाठी काय आहे पंचशक्ती अभियान?

 या चिमुरड्या घरी आल्यानंतर त्यातील एकीच्या गुप्तांगाला वेदना होत होता. त्यानंतर मुलीच्या आईने तीला याबाबत विचारले. मुलीने झालेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही घटना उघड झाली. याबाबत तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही कारवाई करत  45 वर्षीय नराधमा विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने सर्वच जण हादरून गेले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - बदलापूर प्रकरण: संस्थाचालकांना 44 दिवसानंतर अटक, आज कोर्टात नेणार, अटकेचा A TO Z थरार

तर दुसरी घटनाही पुण्याच्या वारजे परिसरात घडली आहे.वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगीक अत्याचार केले. शाळेतील गुड टच बॅड टच उपक्रमातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नराधम बापाला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. पंकज देवेंद्र ठाकूर असं या नराधम बापाचं नाव असून तो 35 वर्षाचा आहे. तो मुळचा बिहारचा राहणारा आहे. मागच्या 1 वर्षापासुन तो मुलीला चक्क अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार करत होता. आरोपीच्या मोबाईलमध्ये असे अश्लील व्हिडिओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलीसांकडून देण्यात आली आहे.