'विधानसभा निवडणूक महायुतीच्या नेतृत्वात लढणार'; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील सर्व जागांचा आढावा भाजपने घेतला आहे.विद्यमान आमदार असलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात 2024 च्या निवडणुका होतील, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र आता विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे नाही तर महायुतीच्या नेतृत्वात लढवल्या जातील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री कोण असेल? यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री कोण असेल हा सध्या विषयच नाही. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार कुणीही मुख्यमंत्रीपदासाठी काम करत नाही. राज्यातील जनतेच्या हितासाठी आम्ही करत आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील सर्व जागांचा आढावा भाजपने घेतला आहे.विद्यमान आमदार असलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळतील. बाकीच्या ठिकाणी विजयी होणारा ताकदीच्या उमेदवारांना तिन्ही पक्षांकडून संधी दिली जाईल, असं एकंदर जागावाटपाचं गणित चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलं.

(नक्की वाचा- "कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात हा भगवा रंग...",  रोख कुणाकडे? 'धर्मवीर 2'च्या डायलॉगची चर्चा)

विधानसभेचे निकष लोकसभेचा लागू होणार नाही

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा निकष लागू होणार नाही. तिन्ही पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीवर नसेल. भाजपने 288 जागांचं विश्लेषण केलं आहे. मात्र कुणी किती जागा लढाव्या याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. 

Advertisement

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)

अजित पवार एनडीए आणि महायुतीसोबतच

अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून विधानसभा लढणार की नाही अशा चर्चा सध्या सुरु आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, अजित पवार महायुतीसोबत असतील यात काही शंका नाही. एनडीए म्हणून लोकसभा निवडणूक लढली आहे. त्यामुळे विधानसभा आम्ही अजितदादांशिवाय कशी लढणार? महायुतीबाबत कोणाताही संभ्रम नाही. अजित पवार एनडीए आणि महायुतीसोबतच असतील. अजित पवार यांना कुठल्याही परिस्थितीत भाजप सोडणार नाही. अजित पवार यांना योग्य त्या जागा देऊ, असं बावनकुळे यांनी म्हटलं. 

Topics mentioned in this article