जाहिरात
This Article is From Feb 16, 2025

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांनाही वगळणार? सरकारचा नवा प्लान समोर

Ladki Bahin Scheme : अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या नियमांचा उल्लंघन करत लाभ घेतला होता. अशा महिलांवर आता सरकारकडून लगाम लावला जात आहे. 

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांनाही वगळणार? सरकारचा नवा प्लान समोर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच अनेक बदल गेल्या काही दिवसात करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचा निदर्शनात आलं आहे. अशा महिलांची छानणी करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. यासाठी सरकार आता आयकर विभागाची मदत घेणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयकर विभागाकडे ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अनेक अपात्र महिलांनी योजनेच्या नियमांचा उल्लंघन करत लाभ घेतला होता. अशा महिलांवर आता सरकारकडून लगाम लावला जात आहे. 

या महिन्याचा हप्ता कधी मिळणार? 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता या महिन्याच्या हप्ताची प्रतीक्षा आहे. "या महिन्याचा हफ्ता येत्या आठ दिवसात वितरित केला जाईल. पात्र महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील. चेकवर सही केली आहे", अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.  

(नक्की वाचा - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)

कोणत्या महिलांना या योजनेतून वगळलं? 

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ घेत असलेल्या जवळपास 2 लाख 30, 000 महिला या लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. शिवाय ज्या महिलांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अशा तब्बल 1,10,000 महिला अपात्र ठरल्या आहे.

(नक्की वाचा- Navi Mumbai : लोन रिकव्हरी एजंन्ट्सचा जाच; शिक्षकाने अटल सेतूवरून उडी घेत संपवलं जीवन)

त्याच बरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1,60,000 इतकी आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 5 लाख महिला या लाडकी बहिण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com