
युतीचं काय होणार? होणार की नाही होणार? याची चर्चा सगळीकडे होत आहे. होणार की नाही होणार हे तुम्हाला लवकरच कळेल. तुमच्या आणि राज्याच्या जे मनात आहे तेच मी करने असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बरोबर युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिना निमित्ता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय आपली राज ठाकरें बरोबर युती होवू नये यासाठी कशा पद्धतीने अडथळे आणले जात आहेत हे ही सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना राज ठाकरे यांच्या बरोबरील युती बाबत काही संकेत दिले आहेत. सध्या बातम्या सुरू आहेत. युती होणार की नाही? ते तुम्हाला लवकरच कळेल. तुमच्या आणि राज्याच्या मनात जे आहे तेच मी करेन. पण ते होवू नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येवू नये , म्हणून यांच्या मालकांचे नोकर इकडे गाठीभेटी घेवू लागले आहेत. हॉटेलमध्ये भेटत आहेत. या मालकांना आणि त्यांच्या नोकरांना मुंबई शिवसेनेच्या हातात जाईल अशी भिती आहे. जर का मुंबईवर शिवसेनेचा ताबा मिळाला या विचारानेच ते हादरले आहेत. पण शिवसेना मुंबईवर पुन्हा ताब्या मिळवणार असे ही उद्धव यावेळी म्हणाले.
काही जण म्हणत आहेत, युती होणार नाही. दोघे एकत्र येणार नाहीत. त्यांचाही उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही आमचं बघू काय करायचं ते. तुम्ही तुमचं बघा. असं सांगत जर तुम्हाला वाटत असेल शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकू, तर तुमचं आणि भाजपचं नामोनिशाण पुसून टाकल्याशिवाय राहाणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने दिला. शिवाय राज यांच्या बरोबर युती करण्यास आपण सकारात्मक असल्याचे संकेत ही त्यांनी दिले.
हे सांगत असताना उद्धव यांनी राज यांच्या बरोबर आपली युती होवू नये साठी काही जण प्रयत्न करत असल्याचं ही ते म्हणाले. दरम्यान हिंदी सक्तीवरही त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. मुंबईत आता हिंदू विरूद्ध हिंदू करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले. मुंबईत आता हिंदू- हिंदू मध्ये मारामाऱ्या लावायचं सुरू आहे. हिंदी सक्तीची करायची. पण हिंदी भाषीकांना आपण वाचवलं होतं. त्यांना आपल्यापासून तोडण्याचं राजकारण सुरू आहे. असं असलं तरी हिंदी सक्तीची होवू देणार नाही. करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा. असा इशाराही उद्धव यांनी यावेळी दिला. जर हिंदी सक्तीची करायची असेल तर ती गुजरातमध्ये करा असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world