जाहिरात

C. Sambhajinagar: दहावीच्या निकालाची धास्ती, विद्यार्थ्यांचा टोकाचा निर्णय; कुंटुबीयांसह सारेच सुन्न झाले

Chhatrapati Sambhajinagar News: दहावीचा निकाल जाहीर होणार असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षेच्या निकालाच्या भीतीने सोहम ज्ञानेश्वर मोरे या 17 वर्षीय विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

C. Sambhajinagar: दहावीच्या निकालाची धास्ती, विद्यार्थ्यांचा टोकाचा निर्णय; कुंटुबीयांसह सारेच सुन्न झाले

अमोल पाटील, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar: संपूर्ण राज्यभरात आज दहावीच्या निकालाची उत्सुकता आणि धाकधूक असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. परीक्षेच्या निकालाच्या भीतीने एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांवरील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

निकालाबाबत मोठी भीती

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर, गल्ली नंबर 10 येथे राहणारा सोहम ज्ञानेश्वर मोरे हा यंदा दहावीच्या परीक्षेस बसला होता. आज सकाळी राज्याचा दहावीचा निकाल जाहीर होणार होता. मात्र, सोहमच्या मनात गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत मोठी भीती होती. आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही, या विचाराने तो प्रचंड तणावाखाली होता.

(नक्की वाचा-  Pandharpur-Tirupati Train: विठूरायाची पंढरी तिरुपतीशी जोडली! 16 मेपासून नियमित रेल्वे धावणार, वाचा टाईमटेबल)

याच निकालाच्या धास्तीतून सोहम याने आज सकाळी घरी कोणी नसताना गळफास घेतला. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधीच त्याने स्वतःला संपवल्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सोहमच्या आत्महत्येमागे परीक्षेचा निकाल आणि त्यातून आलेली भीती हेच प्राथमिक कारण असल्याचे समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: भोंदू खरातचं बँक लॉकर पाहून ईडीचे अधिकारीही थक्क! काय-काय सापडलं?)

पालकांना आवाहन

निकालाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुले दबावाखाली असताना पालकांनी अशा वेळी आपल्या मुलांशी संवाद साधणे आणि त्यांना मानसिक आधार देणे अत्यंत गरजेचे आहे, हे या घटनेतून  समोर आलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com