जाहिरात
This Article is From Apr 20, 2025

CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत

घराच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची सक्ती केली आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत
नवी मुंबई:

प्रथमेश गडकरी

सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत 26,000  घरांची लॉटरी काढण्यात आली. त्यात जवळपास 21,000 जणांना लॉटरीच्या माध्यमातून पसंतीचे घर मिळाले. पण ज्यावेळी या घरांच्या किंमती जाहीर झाल्या त्यावेळी सर्वांना धक्का बसला. गरिबांचे घर आणि श्रीमंतांचे दर अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांनी हे घर घेण्याकडे पाठ फिरवील. त्यात आता नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे लॉटरीधारकांच्या मात्र आशापल्लवीत झाल्या आहेत.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घराच्या किंमती सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याचं लॉटरी विजेत्यांचे म्हणणे होते. हे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी केली गेली. त्यासाठी नवी मुंबईत आंदोलने ही झाली. मनसेने त्यासाठी पुढाकार घेतला होता. आधी साखळी आंदोलन झालं. त्यानंतर इंजेक्शन मोर्चाही काढला गेला. सिडको प्रशासनाला निवेदनही दिले गेलं. पण सिडको प्रशासनाने किंमती कमी करता येणार नाहीत असं स्पष्ट केलं. घरांची बांधणी चांगली आहे. शिवाय सुविधा ही चांगल्या दिल्या आहेत. त्यामुळे किंमती कमी होणार नाही असं सांगण्यात आलं. त्यानंतर अनेकांनी घरेही रद्द केली. 

ट्रेंडिंग बातमी -  Cidco News: सिडकोसमोर मोठे संकट! 21,000 विजेत्यां पैकी किती जणांनी भरली कन्फर्मेशन अमाऊंट?

अशा स्थितीत सिडकोची घरं मिळालेल्या लॉटरीधारकांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलं आहे. त्यासाठी त्यांनी थेट शिंदेंना त्यांच्या दरेगावी गाठवं. सिडको लॉटरी विजेत्यांच्या 32 सदस्यीय कोअर कमिटीने शिंदे यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन ही देण्यात आलं. सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी सोडतधारकांची एकनाथ शिंदेंना साद घातली. शिवाय जे दर आहेत ते सर्व सामान्यांच्या खिशाला कसे परवडणारे नाहीत, हे ही त्यांनी शिंदे यांना पटवून दिले. 

ट्रेंडिंग बातमी - Nanded News: लग्न घरात मंडप टाकण्याचं काम, त्याच वेळी अचानक भयंकर घडलं, वरात निघण्या ऐवजी...

सिडको घरांच्या वाढीव दरांविरोधातील लढा आता अधिक तीव्र झाल्याचं त्यांनी शिंदेंच्या निदर्शनास आणून दिलं. 26 हजार घरांच्या किंमती कमी कराव्यात, या मागणीसाठी मागील दीड महिन्यांपासून सिडको विजेत्यांनी आंदोलने सुरू आहेत. पण सिडको प्रशासनाला त्याचे काही पडले नाही असं ही त्यांनी शिंदेंना सांगितलं. या चर्चेत सोडतधारकांनी वाढीव दरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी स्पष्टपणे मांडल्या. घराच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची सक्ती केली आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Sharad pawar: शरद पवारांसाठी नेत्याची भन्नाट सेटींग, लग्नाला यावं म्हणून काय केलं एकदा पाहाच

त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना फोन  केला. शिवाय पुढील प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दरवाढीचा पुनर्विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. शिवाय काही सोडतधारकांनी विजय सिंघल यांची भेट घ्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या घडामोडीनंतर सिडको विजेत्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. लवकरच घरांचे दर कमी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सिडकोकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com