जाहिरात

CIDCO : नवी मुंबईत रेडी-टू-मुव्ह फ्लॅट खरेदी करण्याची संधी, सबसिडी मिळणार; कुठे-कधीपर्यंत अर्ज करता येणार?

आनंदाची बातमी! सिडकोचे रेडी टू मूव्ह फ्लॅट्स, सरकारकडून मिळणार सबसिडी, अर्ज कसा कराल? शेवटची तारीख काय?

CIDCO : नवी मुंबईत रेडी-टू-मुव्ह फ्लॅट खरेदी करण्याची संधी, सबसिडी मिळणार; कुठे-कधीपर्यंत अर्ज करता येणार?

Navi Mumbai CIDCO House Lottery : नवी मुंबईत घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडने (CIDCO) पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS) आणि (LIG) ग्राहकांसाठी एक खास हाऊसिंग योजना लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत ४५०८ रेडी टू मूव्ह फ्लॅट्स, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार विकले जातील. सर्वात खास बाब म्हणजे, यामध्ये लॉटरी नसेल. ग्राहकांना आपल्या आवडीनुसार, फ्लॅट निवडीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य मिळेल.

याशिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत EWS वर्गाच्या ग्राहकांना २.५० लाख रुपयांची सबसिडीचा लाभ मिळेल. हे फ्लॅट्स नवी मुंबईतील प्रमुख भाग उदा, तळोजा, द्रोणागिरी, घणसोळी, खारघर आणि कळंबोली येथे असतील. याशिवाय हायवे, एअरपोर्ट आणि मेट्रो स्थानकाशी जोडलेले असतील. या योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन २२ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झालं आहे. २१ डिसेंबर ही शेवटची तारीख असेल. 

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य...

सिडकोच्या या नवीन गृहनिर्माण योजनेने लॉटरी पद्धत रद्द केली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या फ्लॅटची थेट निवड करता येईल. ही योजना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वावर चालेल. ४,५०८ फ्लॅटपैकी १,११५ पीएमएवाय अंतर्गत EWS श्रेणीसाठी आहेत, तर उर्वरित ३,३९३ LIG श्रेणीत उपलब्ध आहेत.

२.५० लाखांची सबसिडी...

या योजनेचं सर्वात मोठं आकर्षण २.५० लाखांच्या सबसिडीचं आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत EWS श्रेणीच्या ग्राहकांना याचा लाभ घेता येईल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबाचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यास यामुळे मदत होईल. 

फ्लॅट्स कुठे असतील?

नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या ठिकाणी फ्लॅट्स उपलब्ध असतील. हे सर्व गृहसंकुले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो स्टेशन, लोकल ट्रेन आणि प्रमुख महामार्गांशी थेट जोडलेले आहेत. सर्वात चांगली बाब म्हणजे ही सर्व ४५०८ घरं रेडी टू मुव्ह अशी आहेत. ग्राहक तातडीने घराचा ताबा घेऊ शकतात आणि घराचं काम पूर्ण होण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. 

नक्की वाचा - Golden Metro : मुंबईचा कायापालट निश्चित! 30 मिनिटात सांताक्रूझ ते नवी मुंबई; विमानतळांना जोडणारा भव्य प्रकल्प

EWS श्रेणीतील फ्लॅट्स

EWS श्रेणीसाठी एकूण १,११५ फ्लॅट्स उपलब्ध आहेत. हे फ्लॅट्स द्रोणागिरीच्या प्लॉट क्रमांक १, सेक्टर ११ (२२ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक ६३, सेक्टर १२ (१९ फ्लॅट्स) आणि प्लॉट क्रमांक ६८, सेक्टर १२ (२७ फ्लॅट्स) येथे आहेत. तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात EWS फ्लॅट्स आहेत. ज्यात प्लॉट क्रमांक ८, सेक्टर २१ (४१ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक १, सेक्टर २२ (२१ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक १, सेक्टर २७ (१०५ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक १, सेक्टर ३४ (१५६ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक ६, सेक्टर ३४ (१८८ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक १, सेक्टर ३६ (१३५ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक २, सेक्टर ३६ (३५३ फ्लॅट्स) आणि प्लॉट क्रमांक यांचा समावेश आहे. यामध्ये प्लॉट क्रमांक १, सेक्टर ३७ (२६ फ्लॅट्स), प्लॉट क्रमांक १, सेक्टर ४०, खारघर येथे २० EWS फ्लॅट्स आहेत आणि प्लॉट क्रमांक ९, सेक्टर १५, कळंबोली येथे २ EWS फ्लॅट्स उपलब्ध आहेत.

LIG कॅटेगरीचे फ्लॅट्स

एलआयजी खरेदीदारांसाठी ३,३९३ फ्लॅट्स उपलब्ध आहेत. यामध्ये द्रोणागिरीमधील प्लॉट क्रमांक १, सेक्टर-११ (११० फ्लॅट), प्लॉट क्रमांक ६३, सेक्टर-१२ (१३१ फ्लॅट) आणि प्लॉट क्रमांक ६८, सेक्टर-१२ (१३१ फ्लॅट) यांचा समावेश आहे. तळोजामध्ये एलआयजी फ्लॅट्सची संख्या लक्षणीयरीत्या जास्त आहे. प्लॉट क्रमांक ८, सेक्टर-२१ (१८२ फ्लॅट), प्लॉट क्रमांक १, सेक्टर-२२ (१२४ फ्लॅट), प्लॉट क्रमांक १, सेक्टर-२७ (५१४ फ्लॅट), प्लॉट क्रमांक १, सेक्टर-३४ (५११ फ्लॅट), प्लॉट क्रमांक ६, सेक्टर-३४ (७२७ फ्लॅट), प्लॉट क्रमांक २, सेक्टर-३६ (६८३ फ्लॅट) आणि प्लॉट क्रमांक १, सेक्टर-३७ (१३७ फ्लॅट). खारघरमध्ये प्लॉट क्रमांक १, सेक्टर ४० येथे ११९ एलआयजी फ्लॅट्स आणि कळंबोली येथील प्लॉट क्रमांक ९, सेक्टर १५ येथे २२ एलआयजी फ्लॅट्स उपलब्ध आहेत. घणसोली येथील प्लॉट क्रमांक १, सेक्टर १० येथे एक एलआयजी फ्लॅट आणि सेक्टर १० येथील प्लॉट क्रमांक २ येथे एक एलआयजी फ्लॅट आहे.

सुविधा काय मिळतील?

सिडकोच्या या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्यांसाठी अनेक आधुनिक सुविधा मिळतील. ज्यामध्ये क्लब हाऊस, मुलांना खेळण्यासाठी जागा, सुंदर गार्डन आणि २४ तास सुरक्षा, पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. या सर्व सुविधा रहिवाशांचं जीवन आरामदायी आणि सुखद होईल. 

फ्लॅट निवडीची प्रक्रिया कधीपासून?

२१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलंय त्यांच्यासाठी फ्लॅट निवडीची प्रक्रिया २८ डिसेंबर २०२५ च्या सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल.  सिडकोच्या वेबलाइटवर फ्लॅटचे क्षेत्रफळ आणि किंमत यांसारखी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध असेल. या योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन २२ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झालं आहे. २१ डिसेंबर शेवटची तारीख असेल. इच्छुकांनी सिडकोची अधिकृत वेबसाइट cidcofcfs.cidcoindia.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन शुल्क जीएसटीसह  २३६ रुपयांपर्यंत असेल. रजिस्ट्रेशनवेळी अर्जदारांना ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि निवासी पुरावा यांसारखे कागदपत्र आवश्यक असतील. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com