मोठी बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान उतरणार, तारीख झाली निश्चित

पहिले विमान उतरणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या वेळी उपस्थित राहाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

नवी मुंबई विमातळावर पहिलं विमान कधी उतरणा हे आता निश्चित झालं आहे. त्याची तारीखही ठरली आहे. याबाबतची माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली आहे. त्यांनी नुकताच नवी मुंबई विमानतळाचा आढावा घेतला. या विमानतळावर भारतीय हवाई दलाचं विमान सर्वात पहिले उतरेल असंही त्यांनी सांगितले. शिवाय हे विमान कधी उतरणार आहे याची तारीख ही शिरसाट यांनी सांगितली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय सिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी टेस्ट लँडीग या विमानतळावर होणार असल्याचे सांगितले. भारतीय हवाई दलाचे विमान 5 ऑक्टोबर रोजी विमानतळावर उतरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जेणेकरून भारतीय हवाई दल आपत्कालीन परिस्थितीत या विमानाचा वापर कसा करू शकते हे कळू शकेल असं ही ते म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - DJ चा दणका! चार तास DJ समोर थांबला, घरी गेल्यावर बहिरा झाला, डॉक्टर म्हणाले...

पहिले विमान उतरणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या वेळी उपस्थित राहाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. मार्च 2025 पासून येथून देशांतर्गत विमानसेवा सुरू होईल आणि त्यानंतर जूनपासून येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील अशी माहिती ही त्यांनी दिली.  

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

मुंबईमध्ये सध्या डोमेस्टीक आणि इंटरनॅश्नल अशी दोन विमानतळ आहेत. जगातील सर्वात व्यस्त विमानतळा पैकी ही विमातळ आहेत. त्यामुळे त्याव मोठ्या प्रमाणात ताण आहे. हा ताण कमी होण्यासाठी नवी मुंबई इथे विमानतळ बांधण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हे विमानतळ बांधण्यात आले आहे.हे विमानतळ आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्यावरून विमान वाहतूक सुरू होईल.