गणेश विसर्जना वेळी डिजेचा दणदणाट सर्वत्र होता. तसाच दणदणात पुणेकरांनीही अनुभवला. पण त्याचा फटका एका 32 वर्षाच्या तरूणालाही बसला आहे. हा तरूण पुण्यात गणेशविसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. तो डिजे समोर तब्बल चार तास होता. शिवाय ज्या वेळी विसर्जन मिरवणूक कात्रज चौकात आली, त्यावेळी चार गणेश मंडळ एकत्र आली होती. त्या वेळी चारही मंडळाच्या डीजेचा आवाज घात करून गेला. तो तरूण, ज्यावेळी घरी गेला त्यावेळी त्याला ऐकू येत नव्हते. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी डॉक्टरांनी जे सांगितलं त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकरली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गणेश विसर्जनाच्या दिवशी डीजेच्या दणदणाटामुळं 32 वर्षीय तरुण सागर मोरेचे दोन्ही कान निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा एक कान 95 टक्के तर दुसरा कान 85 टक्के निकामी झाला आहे. सागर मोरे याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्याल आता घरी सोडण्यात आले आहे. गणेश विसर्जनावेळी कात्रज चौकामध्ये चार गणेश मंडळांच्या डीजेच्या दणदणाटेमुळेच सागरचे दोन्ही कान निकामी झाले आहे.
ट्रेंडिंग बातमी - का रे हा दुरावा? अमित शाह गडकरींच्या नागपुरात पण गडकरी मात्र काश्मीरात, कारण काय?
उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या शुर शिवबा गणेश मंडळाचा सागर हा कार्यकर्ता आहे. वसंत मोरे यांनीही सागर याची भेट घेतली. शिवाय या पुढे कधी गणेश विसर्जनात डीजे न लावण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. सागर याला दोन मुली आहेत. छोटी-मोठी बांधकाम कंत्राटी घेऊन तो त्याचं घर चालवतो. मात्र आता दोन्ही कान निकामी झाल्यामुळे, सागरला भविष्याची चिंता सतावत आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर
दरम्यान वेळेवर झालेल्या उपचारानंतर डाव्या कानाला 40 टक्के फरक पडला आहे. तर उजवा कान दुरुस्त होण्याची शक्यता फार कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. डॅाक्टरांनी त्याला सर्जरीचा सल्ला दिला आहे. उपचारानंतरही डाव्या कानाला 41% फटका बसला आहे, तर उजव्या कानाला 86% टक्के फटका बसला आहे. सागर समोर आता ऑपरेशन करण्या शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहीलेला नाही. त्यातूनही किती फरक पडेल याची हमी नाही. त्यामुळे भविष्यात काय होईल याची चिंता त्याला लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world