सूरज कसबे, प्रतिनिधी
Ekvira Devi Temple Viral Video : कार्ला येथील आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला गालबोट लागलं आहे. कार्ला गड उतरताना झालेल्या वादातून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीमुळे काही भाविक जखमी झाले आहेत.कल्याण आणि पनवेल येथील भाविकांच्या दोन गटात हमरीतुमरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.दोन गटातील भाविकांमध्ये झालेल्या वादविवादाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
एकविरा देवीची मुख्य यात्रा संपन्न झाल्यानंतर भाविक गड उतरत असताना हा प्रकार घडला. काल बुधवारी झालेल्या किरकोळ वादानंतर आज दुपारी पुन्हा एकदा वातावरण तापलं.किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. या अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने भविकांमध्ये पळापळही झाली.