जाहिरात

किसन कथोरेच तुमचे मुख्यमंत्री! फडणवीसांचं बदलापुरात मोठं वक्तव्य, MMRDA बाबत दिली Good News

CM Devendra Fadnavis in Badlapur : मुख्यमंत्र्यांनी आमदार किसन कथोरेंबद्दल मोठं वक्तव्य केलं. तसंच बदलापुरकरांना एक गुड न्यूज देखील दिली. 

किसन कथोरेच तुमचे मुख्यमंत्री! फडणवीसांचं बदलापुरात मोठं वक्तव्य, MMRDA बाबत दिली Good News
बदलापूर:

निनाद करमकर, प्रतिनिधी

CM Devendra Fadnavis in Badlapur : बदलापूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज (मंगळवार, 18 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोल ताशांच्या गजरात अनावरण केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आमदार किसन कथोरेंबद्दल मोठं वक्तव्य केलं. तसंच बदलापुरकरांना एक गुड न्यूज देखील दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 बदलापूर शहरातील उल्हास नदीकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने अनावरण केलं. यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड उपस्थित होते. 

( नक्की वाचा : मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा )

पुतळ्याच्या अनावरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हायड्रोलिक ट्रॉलीच्या माध्यमातून पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर जाहीर सभेला संबोधताना त्यांनी बदलापूर शहरात एमएमआरडीएची अडकलेली सगळी कामं पूर्ण करू आणि एमएमआरडीएचा निधी बदलापूर पर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करू, असं आश्वासन दिलं. 

पाच वेळा निवडून आलेले किसन कथोरे हे मंत्री झाले नसले, तरी प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे किसन कथोरे हेच तुमचे मुख्यमंत्री आहेत, काळजी करू नका, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: