जाहिरात

Big News: CM फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; NCP च्या विलिनीकरणावर मोठा निर्णय होणार?

Breaking News: देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Big News: CM फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; NCP च्या विलिनीकरणावर मोठा निर्णय होणार?

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

CM Devendra Fadnavis Delhi Visit : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा आणि सुनेत्रा पवारांचा आगामी दिल्ली दौरा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अचानक दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या बैठकीत खलबतं झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

(नक्की वाचा-  Solapur ZP Result: राम सातपुतेंनी वचपा काढला! मोहिते-पाटील अन् जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा गुलाल)

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रामुख्याने चर्चा

देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या विलीनीकरणाबाबत भाजपची नेमकी भूमिका काय असेल, यावर या दौऱ्यात गांभीर्याने चर्चा झाली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही स्थानिक नेत्यांनी दावा केला होता की लवकरच विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होऊ शकते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाच्या वावड्या असल्याचे सांगत केवळ 'निवडणूक समन्वय' साधण्याबाबत अजितदादांची भूमिका होती, असे स्पष्ट केले आहे. मात्र, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव पाहता विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत गाडी चालवण्यासाठी भरावा लागणार 'कंजेश्चन टॅक्स'? भाजप नेत्याचा BMC ला प्रस्ताव)

सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा

नव्याने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार देखील येत्या 12-13 फेब्रुवारीला दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर आणि राज्यसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com