Kunal kamra : एक गाणं अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप, कुणाल कामराचा 4 शब्दांचं ट्वीट चर्चेत

Kunal Kamra Controversy : कुणाल कामराने शिंदे गटाच्या बंडाची खिल्ली गाण्यातून उडवली आहे. शिवसेना पक्षातील फूट, गुवाहाटीला जाणे, भाजपसोबत युती करणे या सर्वावर कुणालने या गाणातून भाष्य केलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा महाराष्ट्राच्या राजकारणावरील व्हिडीओ सध्या वादात अडकला आहे. शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदेवर विडंम्बनात्मक गाणं तयार केलं, यावरून शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराचा शो जिथे झाला त्या खारमधील स्टुडिओमध्ये झाला तिथे शिवसैनिकांनी तोडफोड केली. कुणाल कामराला देखील धमक्या दिल्या जात आहे. या सर्व घडामोडींनंतर कुणालचं ट्वीट चर्चेत आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुणाल कामराने हातात संविधानाचं पुस्तक घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासाठी त्यांनी कॅप्शन लिहिलं की, "The only way forward..." कुणालचं हे ट्वीट शिवसैनिकांना उत्तर असल्याचं बोललं जात आहे. 

(नक्की वाचा-  'गद्दार नजर वो आए...', कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर गाणं, भडकलेल्या शिवसैनिकांकडून तोडफोड)

काय आहे प्रकरण?

कुणाल कामरा नेहमीच आपल्या विनोदी शैलीतून राजकीय घडामोडींवर भाष्य करतो. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर तो नेहमीच विनोद करताना दिसला आहे. मात्र यावेळी त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरही विडंम्बनात्मक गाणं तयार केलं. शिंदे गटाच्या बंडाची खिल्ली या गाण्यातून उडवली आहे. शिवसेना पक्षातील फूट, गुवाहाटीला जाणे, भाजपसोबत युती करणे या सर्वावर कुणालने या गाणातून भाष्य केलं. 

नक्की वाचा - Shivsena news: शिंदेंचे शिलेदार एकमेकानाच भिडले, भर रस्त्यात राडा, कल्याणमध्ये नेमकं काय झालं?

काय आहे गाणं?

"ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... 
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... 

एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये...
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए...

ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... 
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये...?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए...
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए... 
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे... 

Advertisement

मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या गाण्यातून एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अपमानास्पद गोष्टींविरोधात कारवाई केली जाईल. 

Topics mentioned in this article