जाहिरात

मुंबईत 25 लाखांची नोकरी, पण मराठी माणसाला बंदी? फक्त 2 समाजाला रेड कार्पेट... वाचा काय आहे सर्व प्रकार

Mumbai job discrimination Marathi candidates : मुंबईत चक्क मराठी माणसालाच नोकरी नाकारली जात असल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबईत 25 लाखांची नोकरी, पण मराठी माणसाला बंदी? फक्त 2 समाजाला रेड कार्पेट... वाचा काय आहे सर्व प्रकार
Mumbai job : या जाहिरातीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Mumbai job discrimination Marathi candidates : महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि मराठी माणसाचा कणा असलेल्या मुंबईत चक्क मराठी माणसालाच नोकरी नाकारली जात असल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रतिष्ठित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीरपणे करण्यात आलेल्या या पक्षपातामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

हा धक्कादायक प्रकार नोकरी.कॉम आणि लिंक्डइन या नामांकित व्यावसायिक सोशल नेटवर्किंग साइट्सवर समोर आला आहे. मुंबईतील एका खासगी कंपनीसाठी अहमदाबादमधील एका एजन्सीने नोकरीची जाहिरात पोस्ट केली होती. या नोकरीसाठी वार्षिक तब्बल 25 लाख रुपये इतके मोठे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. 

मात्र, या जाहिरातीच्या अटींमध्ये कंपनीने अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त उल्लेख केला. या पदासाठी 'ओन्ली गुजराती मारवाडी कॅन्डीडेट' (फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवार) अशी उघड अट घालण्यात आली होती. याचाच सरळ अर्थ असा की, मुंबईत असूनही या मोठ्या पॅकेजच्या नोकरीसाठी मराठी उमेदवारांना अर्ज करण्याचीही बंदी घालण्यात आली होती.

( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
 

दोन दिवसांचा अल्टिमेटम

या वादग्रस्त जाहिरातीचा स्क्रीनशॉट समोर येताच मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मराठी लोकांना मुंबईत जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोवर्धन देशमुख यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, पुढील दोन दिवसांत या संबंधित कंपनीचा शोध घेऊन तिथे थेट धडक देणार असल्याचा इशारा दिला आहे. 

या कंपनीवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून तात्काळ गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये खळबळ! क्लस्टर योजना अडवण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळले; थेट राजकीय नेत्यांवर गुन्हा )

राजकीय वर्तुळातही पडसाद

हा मुद्दा केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता आता राजकीय स्तरावरही चांगलाच तापला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत थेट 'खळ्ळ्खटॅक'चा इशारा दिला आहे. मुंबईत राहून मराठी माणसाला दुय्यम स्थान देणाऱ्यांना मनसे स्टाईलने उत्तर देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

गिरगावमधील जुन्या प्रकरणाची आठवण

मुंबईमध्ये मराठी उमेदवारांना अशा प्रकारे डावलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2024 मध्ये गिरगाव परिसरातील एका खाजगी कंपनीने ग्राफिक डिझायनर पदासाठी अशीच जाहिरात लिंक्डइनवर दिली होती. त्या जाहिरातीत तर थेट 'मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये' असे स्पष्ट लिहिले होते. त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाला होता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com