जाहिरात

Navi Mumbai: थरकाप उडवणारी घटना! परदेशी जॉबच्या नादात तरुण कंगाल, नवी मुंबईतील एजंटने लाखो रुपयांना गंडवलं

Navi Mumbai News: नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे परदेशात जहाजावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरुणासोबत धक्कादायक घटना घडली आहे. वाचा सविस्तर माहिती...

Navi Mumbai: थरकाप उडवणारी घटना! परदेशी जॉबच्या नादात तरुण कंगाल, नवी मुंबईतील एजंटने लाखो रुपयांना गंडवलं
"Navi Mumbai News: नवी मुंबईतील धक्कादायक घटना"
NDTV Marathi
  • नवी मुंबईत जहाजावर नोकरी देण्याचा फसवणूक प्रकरण समोर आले असून तरुणाकडून लाखो रुपये घेतले गेले
  • जळगावच्या 25 वर्षीय राहुल पाटीलची 2 लाख 10 हजार रुपयांना फसवणूक
  • नोकरी न मिळाल्याने राहुलने पैसे परत मागितले असता कार्यालयात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News:
परदेशात जहाजावर (शिपिंग) नोकरी लावून देतो, असे सांगून एका तरुणाकडून लाखो रुपये उकळण्यात आले. पण ठरल्याप्रमाणे नोकरी न मिळाल्याने हतबल झालेल्या तरुणाने आपले पैसे परत मागितले असता, त्याला कार्यालयातच बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे समोर आला आहे. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जहाजावर नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक| Falsely promising A Ship job and cheating lakhs of rupees

मूळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेला 25 वर्षीय तरुण राहुल मधुकर पाटील गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात होता. यादरम्यान त्याची ओळख हिरेन शेख नावाच्या व्यक्तीशी झाली. हिरेनने राहुलला परदेशातील जहाजावर चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवले. या नोकरीच्या बदल्यात त्याने राहुलकडून तब्बल 2 लाख 10 हजार रुपये उकळले. पण पैसे घेऊन बराच काळ उलटल्यानंतरही राहुलला कोणतीही नोकरी मिळाली नाही.

(नक्की वाचा : Beed Crime: तू काळी, पांढऱ्या पायाची... विवाहितेची निर्घृण हत्या, मृतदेह विहिरीत; भयंकर घटनेने बीड हादरलं)

कार्यालयात विचारणा करायला गेल्यावर बेदम मारहाण| Brutally assaulted after demanding money back at the office

नोकरी मिळत नसल्याचे पाहून अखेर 10 जून रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास राहुल पाटील सीबीडी बेलापूर सेक्टर-15 मधील विष्णू कॉम्प्लेक्स येथे असलेल्या 'अरेबिक शिप मॅनेजमेंट' (Arabic Ship Management) कार्यालयात गेला. तिथे त्यानं हिरेन शेख याच्याकडे नोकरीबाबत विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. जेव्हा राहुलने नोकरी नको, माझे 2 लाख 10 हजार रुपये परत द्या अशी मागणी केली, तेव्हा हिरेन शेख आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पारा चढला. त्यांनी कार्यालयातच राहुलला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत "तुला बघून घेईन" अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.

सीबीडी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद| Non-cognizable offense registered at CBD police station

या मारहाणीनंतर राहुल पाटीलने थेट सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे संशयित आरोपी हिरेन शेख आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115, 352 आणि 351(2) अन्वये अदखलपात्र गुन्हा क्रमांक 727/2026ची नोंद केली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 168 अन्वये नोटीस बजावण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

(नक्की वाचा : Mumbai News: गांजा तस्करी करताना मॉडेलला अटक; मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई)

बनावट शिपिंग कंपन्यांपासून सावध राहण्याचे आवाहन| Police warning against fake shipping and placement agencies

 नोकरीच्या आमिषाने पैसे उकळणाऱ्या बनावट प्लेसमेंट एजन्सी आणि शिपिंग कंपन्यांपासून सुशिक्षित तरुणांनी सावध राहावे, असे आवाहन सीबीडी पोलिसांनी केले आहे. कोणत्याही एजंटला किंवा कंपनीला मोठी रक्कम देण्यापूर्वी त्या कंपनीची अधिकृत नोंदणी, परवाने आणि त्यांची भूतकाळातील कामगिरी याची सखोल खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावा, असा सल्ला कायदे तज्ज्ञांनी दिला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com