जाहिरात

Zp Election 2026: मतदानादिवशी खळबळ, या मतदान केंद्रात EVM मशीनखाली 'जादूटोणा', टाचण्या, लिंबू, मिरची अन्..

लोकशाहीचा उत्सव सुरू असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Zp Election 2026: मतदानादिवशी खळबळ, या मतदान केंद्रात EVM मशीनखाली 'जादूटोणा', टाचण्या, लिंबू, मिरची अन्..
Black Magic At Solapur Voting Booth

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Solapur ZP Election 2026 : लोकशाहीचा उत्सव सुरू असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनखाली चक्क टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची ठेवून जादूटोणा केल्याचा खळबळजनक आरोप अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी केला आहे.या धक्कादायक प्रकारामुळे मतदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

मतदान केंद्रात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एक महिला मतदार मतदान करण्यासाठी केंद्रात गेली. मतदान करून बाहेर येत असतानाच त्या महिलेला अचानक चक्कर आली आणि ती जागीच कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर त्या महिलेने ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू-मिरची आणि जादूटोण्याचे साहित्य पाहिल्याचे सांगितले.

नक्की वाचा >> Malegaon News : मालेगावात 'इस्लाम'ची सरशी, महापौरपदाच्या निवडणुकीचं चित्रच पालटलं, BJP आणि MIM नगरसेवकांनी..

महिलेने सांगितलेल्या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी तातडीने मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना ईव्हीएम मशीनच्या खालील बाजूस टाचण्या टोचलेले लिंबू आणि मिरची आढळून आली. हे पाहून उमेदवार आणि तेथील प्रतिनिधींना मोठा धक्का बसला.

निवडणूक आयोग काय कारवाई करणार?

या जादूटोण्याच्या प्रकारात जे अधिकारी आणि उमेदवार सामील आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी संदीप राठोड यांनी केली आहे. "लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशा प्रकारे जादूटोणा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे,हा प्रकार निंदनीय आहे," असेही राठोड यांनी यावेळी म्हटलं आहे. या प्रकरणावर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com