जाहिरात

Dadar Video Viral: महिला बसलीय तिथेच उभा राहून लघवी करतोय, दादर शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या संतापजनक प्रकार

Dadar Video Viral: दादरच्या शिवाजी पार्कमध्ये संतापजनक घडलीय, याविरोधात नेटकरी आपला तीव्र राग व्यक्त करत आहेत.

Dadar Video Viral: महिला बसलीय तिथेच उभा राहून लघवी करतोय, दादर शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या संतापजनक प्रकार
"Dadar Video Viral: दादर शिवाजी पार्कमधील धक्कादायक व्हिडीओ"

Dadar Video Viral: सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचं- कसे बोलायचं, काय करायचं? याचं भानच काही लोकांना राहिलेले नाही. सोशल मीडियावरही असे कित्येक व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. सार्वजनिक ठिकाणी घडणारे भयंकर प्रकार पाहून घराबाहेर पाऊल ठेवावे की ठेवू नये, असे विचारही मनात येऊ लागतात. दादरच्या शिवाजी पार्कामध्येही दिवसाढवळ्या असाच काहीसा प्रकार घडलाय, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

दादर शिवाजी पार्कात नेमके काय घडलं? | Dadar Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी लघवी करताना दिसतोय. चीड आणणारी बाब म्हणजे शेजारच्या बाकावर एक महिला बसलीय, याचंही त्या पुरुषाला भान नाहीय. shivajipark_ आणि dadarmumbaikar या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. नेटकरी या किळसवाण्या प्रकाराविरोधात संताप व्यक्त करत आहेत. 

लघुशंका करणाऱ्या व्यक्तीविरोधात नेटकऱ्यांनी व्यक्त केला राग | Dadar Shivaji Park Video Viral

akshay_n7 नावाच्या युजरने लिहिलंय की, "असा खूप वेळा प्रकार घडतो आहे सध्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये, एकाला तर फटके पण दिले होते मी, पण आपलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क फक्त आणि मोठमोठ्या लोकांचे कार्यक्रम असतील तेव्हा आणि शिवजयंती असेल तेव्हाच चांगले असते आणि पोलिसांच्या परेड असतात तेव्हाच फक्त चांगले असते, बाकीच्या वेळेस दारूच्या बाटल्या तसेच सिगारेट ओढत बसलेले गर्दुल्ले असतात, लहान मुलांनी न बघितले अशा गोष्टी पण आपल्या पार्कमध्ये असतात, आमच्या समोर दिसेल तेवढे आम्ही उचलून त्याची विल्हेवाट लावतो, पण बाकीच्या वेळेस काय? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे?"

sarangpratim या युजरने म्हटलंय की, "दोन मिनिटांवर शौचालय आहे तसेच बाजूला मुलगी बसली आहे. ह्याचा कानाखाली आवाज काढलाच पाहिजे".

adv_tamhankar नावाच्या युजरने मुंबई पोलिसांना टॅग करून @mumbaipolice म्हटलंय की, "एक स्त्री बाजूला बसलेली असून सुद्धा खुल्यामध्ये लिंग बाहेर काढून लघवी करत प्रकरणी कलम २९६ भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करा".

(नक्की वाचा: Thumak Thumak Trending Song Video: जगावेगळे डोहाळे! ठुमक ठुमक ट्रेंडिंग गाण्यावर 8 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेचे जबरदस्त ठुमके)

francis.lobo_mns नावाने म्हटलंय की, "त्याला झोडलं पाहिजे होतं... बाजूला आहे मुतारी तरी बाहेर करायला उभा राहिला".

neha.patange.31 म्हणाल्या आहेत की, "अशा माणसांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे".

anil_lole नावाच्या युजरने उपहासात्मक टीका करत म्हटलंय की,"हे बरंय, खुल्यामध्ये सामान बाहेर काढून मुतलं कि चालतंय आणि एखाद जोडपं जरा प्रेमानं मिठी मारून बोललं किंवा किस केलेलं चालत नाही.... अजब नियम आहे".

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com