जाहिरात

Viral Video : दिल्ली स्फोटानंतर देशभर तपासणी, गाडीच्या डिक्कीत मामाच्या मुलाला कोंबलं; Video पाहून पोलीस हैराण

पोलिसांकडून प्रत्येक गाड्यांची तपासणी केली जात आहे. यादरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे.

Viral Video : दिल्ली स्फोटानंतर देशभर तपासणी, गाडीच्या डिक्कीत मामाच्या मुलाला कोंबलं; Video पाहून पोलीस हैराण

Delhi viral video : दिल्ली स्फोटाने देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाचे धागेदोरे दहशतवादाशी जोडले जात आहे. दरम्यान दिल्लीत पोलिसांकडून प्रत्येक गाड्याची तपासणी केली जात आहे. यादरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे. 

सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. त्यात गाड्यांची कडक तपासणी केली जात आहे. यादरम्यान एक अजब किस्सा समोर आला आहे. लग्न आटोपून एक कुटुंब कारमधून घरी परतत होते. दिल्ली पोलिसांनी ही लाल रंगाची कार रोखली. सर्वांना खाली उतरायला सांगितलं. यानंतर दिल्ली पोलीस गाडीच्या डिक्कीकडे वळले. चालकाने डिक्की उघडली तर पोलिसांना एक तरुण डिक्कीत आढळला. हे दृश्य पाहून पोलिसही हैराण झाले. त्यांना काहीतरी संशयास्पद असल्याचं वाटलं. मात्र काही वेळाने कारमधील एका व्यक्तीने तरुणाला उठवलं. दोन वेळा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तरीही तो उठत नव्हता. त्यामुळे काही वेळासाठी सर्वजण हबकले. मात्र तिसऱ्यांना त्याला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने कानातून हेडफोन काढले आणि समोर पोलिसांना पाहून तो बावरला. तरुण डिक्कीत झोपला होता. 

Viral Video : मोठेपणी काय होणार? विद्यार्थ्याचं उत्तर ऐकताच वर्गशिक्षिकेने काढला पळ, पाहा Video

नक्की वाचा - Viral Video : मोठेपणी काय होणार? विद्यार्थ्याचं उत्तर ऐकताच वर्गशिक्षिकेने काढला पळ, पाहा Video

मामाच्या मुलाला डिक्कीत कोंबलं...

यावर कारमधील एका व्यक्तीने सांगितलं, हा माझ्या मामाचा मुलगा आहे. गाडीमध्ये जागा कमी आहे. त्यामुळे त्याला डिक्कीत झोपवलं. असं सांगत त्यांनी तो तरुण ज्याचं नाव सत्यम आहे, त्याला उभं राहायला सांगितलं. हे सर्व दृश्य पाहून पोलीसही हैराण झाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com