Thumak Thumak Trending Song Video: प्रेग्नेंसीदरम्यान महिलांना वेगवेगळ्या गोष्टी खाण्याचे डोहाळे लागतात. या दिवसात चिंच, बोरे, आवळे, कैरी यासह विविध खाद्यपदार्थ, फळं, भाज्या खाण्याची गर्भवतींना इच्छा होते. परंपरेनुसार सातव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. यानंतर महिलेला पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असते, असे म्हणतात. पण बदलत्या लाइफस्टाइलनुसार डोहाळे आणि डोहाळे जेवणाच्या पद्धती बदलल्या आहेत, याची कित्येक उदाहरणं तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. अशाच एका प्रेग्नेंट महिलेचे व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत आहेत. चक्क डान्स करण्याचे डोहाळे लागल्याचे तिने सांगितलंय. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या 'ठुमक ठुमक जानिये महिये दे नाल' या गाण्यावर आठ महिन्यांच्या गर्भवतीने सुंदर डान्स केलाय. प्रेग्नेंट महिलेने गाण्यावर असा ठेका धरलाय की नेटकऱ्यांनीही तिचे तोंडभर कौतुक केलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील 'Tanishka Adaniya' नावाच्या हँडलवर या महिलेचे डान्स करतानाचे कित्येक व्हिडीओ पाहायला मिळतील.
1. ठुमक ठुमक गाण्यावर 8 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेचे जबरदस्त ठुमके | 8 month Pregnant Lady Dancing On Thumak Thumak Trending Song
2. प्रेग्नेंसीच्या नवव्या महिन्यातील व्हिडीओ | 9th Month Of Pregnancy Video
3. 'कभी खुशी कभी गम' सिनेमातील 'देखा तुमको जब से देखा तुमको यारा' गाण्यावर भन्नाट डान्स
(नक्की वाचा: Viral Video: पोटात 7 महिन्यांचं बाळ, मैदानात उतरली, पोट आत घेऊन तब्बल 145 किलो वजन उचललं; लोकांचे डोळेच फिरले)
4. सोनू निगमने गायलेल्या 'तुझे लागे ना नज़रिया. क्यू ना ओढ़े तू चुनरिया' गाण्यावरील रील | Tujhe Lage Na Song
5. एपी ढिल्लोच्या गाजलेल्या गाण्यावरील रील
(नक्की वाचा: Pregnant Woman Dance Video: 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने Stree 2 सिनेमातील गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले Wow)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

