विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि महायुतीच्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत महायुतीच्या यशाबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, "एक है तो ‘सेफ' है! मोदी है तो मुमकिन हैं!" देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. भाजप सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष बनेल हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
(नक्की वाचा- महायुतीचा विराट विजय! CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...)
26 नोव्हेंबर रोजी शपथविधी होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीत महायुती ऐतिहासिक कामगिरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महायुतीचा सत्तास्थापनेच मार्ग मोकळा दिसत आहे. भाजपच्या विधीमंडळ सदस्यांची 25 नोव्हेंबर रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. तर 26 नोहेंबर रोजी शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतून अंतिम निर्णय आल्यावर याबाबत ठरणार आहे.
(नक्की वाचा: घड्याळाचा गजर, तुतारी थंड! शरद पवार विरुद्ध अजित पवार लढाईत कोण जिंकलं?)
सध्याच्या स्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. "महायुतीत भाजपच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील", असं भाजप नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्ध पुकारले होते. त्याला जनतेने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहीजे. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत", असं मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.