Mumbai News : महाकुंभच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; जाळ्यात कसं अडकवायचे?

Mumbai Crime News : लोअर परळमध्ये फर्निचर शोरूम चालवणाऱ्या एका 55 वर्षीय व्यावसायिक महिलेची जवळपास 4 लाखांची फसवणूक झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : सायबर गुन्हेगारांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतीही श्रद्धा किंवा दया-माया न दाखवता सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहे. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून त्यांची फसवणूक करत आहेत. अशी दोन प्रकरणे मुंबईतून समोर आली आहे. महाकुंभच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

लोअर परळमध्ये फर्निचर शोरूम चालवणाऱ्या एका 55 वर्षीय व्यावसायिक महिलेची जवळपास 4 लाखांची फसवणूक झाली आहे. महाकुंभमध्ये पवित्र स्नानाच्या नावाखाली महिलेची ऑनलाइन फसवणूक झाली. यूपी स्टेट टुरिझम नावाने खाते असल्याने महिला या घोटाळ्याला बळी पडली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सोमवारी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महिला पतीसह प्रयागराजला जाणार होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन तंबू बुकींगसाठी गूगलवर सर्च केलं. त्यावेळी त्यांना Tentcitymahakumbh.org नावाची एक वेबसाईट सापडली. येथे संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना माहितीपत्रक दिले आणि सहा प्रवाशांचे तपशील मागितले. समोरील व्यक्तीने VIP तंबूंचे फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवले. तिला IFSC कोडसह UP State Tourism II नावाच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले.

याशिवाय विमानाचे बुकिंग फुल असतानाही तिकीट देण्याच्य नावाखाली पैसे घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी महिलेचा फोन उचलणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जात याबाबत तक्रार केली. आरोपींनी या महिलेची तंबू आणि विमान प्रवासाच्या नावाखाली एकूण 3 लाख 78 हजारांची फसवणूक केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO : गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरचा सरावादरम्यान मृत्यू; 270 किलोचा रॉड अंगावर पडला)

हेलिकॉप्टर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक 

दुसऱ्या एका प्रकरणात कफ परेड पोलिसांनी बिहारमधील पाच जणांना महाकुंभ हेलिकॉप्टर राईडचे आश्वासन देणारी बनावट वेबसाइट तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुकेश कुमार, सौरभ कुमार, अविनाश कुमार, सृष्टी बर्नावाल आणि संजितकुमार मिस्त्री अशी आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक झालेल्या महिलेने 26 जणांसाठी हेलिकॉप्टर राईडची बुकिंग केली.

(वाचा- Best bus fare hike : बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार)

यासाठी तिने 60,652 रुपये भरले होते. महिलेने पैसे पाठवल्यानंतर तिच्या लक्षात आले की पैसे सरकारी एजन्सीच्या खात्यात गेले नाही. त्यानंतर वेबसाइट देखील गायब झाली. त्यानंतर महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केल्यानंतर बिहारमधील एटीएममधून पैसे काढल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी एटीएम कॅमेऱ्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि एकामागून एक पाच आरोपींना अटक केली.

Advertisement
Topics mentioned in this article