जाहिरात

Best bus fare hike : बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार

Best Bus : बेस्टचे महाव्यस्थापक श्रीनिवास यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 

Best bus fare hike : बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार

लांब पल्ल्याच्या एसटीच्या तिकीट दरात काही दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबईतील प्रवास आरामदायी करणाऱ्या बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या बेस्ट बसचे किमान तिकीट पाच रुपयांपासून सुरू होतात. आता हेच दर दुप्पट होणार असल्याची माहिती आहे. बेस्टचे महाव्यस्थापक श्रीनिवास यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. बेस्ट प्रशासन दर वाढ करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून शासनाने मंजुरी दिल्यावर अंमलबजावणी करणार असल्याची माहिती आहे. 

सध्या बेस्ट बसचे तिकीट दर पाच रुपयांपासून सुरू होतात. आता 5 रुपयांचं तिकीट 10 रुपये तर 6 रुपयांचं तिकीट 12 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: