शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli Car Accident News : पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा संख ते पंढरपूर मार्गावर उमदीजवळ भीषण अपघात झाला.या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून सहा महिला जखमी झाल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे चैत्र एकादशी निमित्त सांगलीच्या जत तालुक्यातील भाविक संखहून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जातात. आज जत तालुक्यातील संखहुन निघालेल्या इको कारचा उमदीजवळ भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यनेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार,संख येथील भाविक आणि वारकरी पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते.परंतु उमदीजवळ जाताना चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने ती कार ट्रकला जाऊन धडकली. इको कारचा चालक सांगांपा नाव्ही (रा.माडग्याळ)यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात एकूण सहा महिला जखमी झाल्या आहेत.
नक्की वाचा >> Amravati News: अमरावती हादरलं! दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला 5 जणांनी अडवलं, जंगलात नेऊन केलं सर्वात भयंकर कृत्य
जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू
जखमींना तातडीने सोलापूर येथील सीएनएस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इको कारमध्ये एकूण सहा प्रवासी पंढरपूरकडे निघाले होते.उर्वरित प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावरही जत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा >> Jalgaon News: जळगावात मन सुन्न करणारी घटना! पती-पत्नीनं स्वत:च्या शेतात संपवलं जीवन, उंबराच्या झाडावर..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world