
ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पळसपमध्ये रामपाल महाराजांच्या भक्तीबाबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत लाकाळ असून 65 वर्षे वय होते, आरोपी मुलगा वैभव लाकाळ आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी दोघांमध्ये रामपाल महाराजांच्या भक्तीच्या मुद्द्यावरून तीव्र वाद झाला. वाद वाढताच संतप्त वैभवने वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने प्राणघातक वार केला.

गंभीर जखमी अवस्थेत चंद्रकांत लाकाळ यांना तातडीने लातूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आठ दिवस उपचार सुरू असतानाच 8 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Love Story : भयंकर! विवाहित महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं, पती सोबत विवस्त्र केलं आणि स्क्रूड्रायव्हरनं... )
या प्रकरणी मृत चंद्रकांत लकाळ यांटा दुसरा मुलगा प्रमोद लाकाळ याने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिस तपासात धार्मिक विचारभिन्नतेतूनच वाद वाढल्याचे उघड झाले आहे.
या घटनेनंतर पळसप गावात शोककळा पसरली आहे. एका धार्मिक वादातून जीव गमावण्याच्या सर्वांना एकच धक्का बसलाय. दरम्यान पुढील तपास पोलिस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world