जाहिरात

धारावीत बदलाचे वारे! 2250 भाडेकरार पूर्ण, बँक खात्यात जमा होणार घरभाडे; रहिवाशांना असा मिळतोय फायदा

Dharavi Redevelopment Project: राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे.

धारावीत बदलाचे वारे! 2250 भाडेकरार पूर्ण, बँक खात्यात जमा होणार घरभाडे; रहिवाशांना असा मिळतोय फायदा
मुंबई:

Dharavi Redevelopment Project: राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी देखील सहकार्याची भूमिका घेत पुनर्विकासाच्या दिशेने पाऊल पुढे टाकले आहे. अदाणी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीत आतापर्यंत 2250 हून अधिक रहिवाशांसोबत भाडेकरार पूर्ण झाले आहेत. तसेच 1023 कुटुंबांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्वेच्छेने आपली घरे रिकामी केली आहेत.

रहिवाशांचा सकारात्मक प्रतिसाद 

रहिवाशांकडून मिळणाऱ्या या सकारात्मक प्रतिसादामुळे पुनर्विकास प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकत आहे. धारावीतील काही निवडक ठिकाणी पाडकामाला सुरवात झाली असून, अद्याप सुमारे 570 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. यामुळे पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी जागा उपलब्ध करून घेणे शक्य होत असल्याचे एएनडीपीएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक पात्र रहिवाशाला हक्काचे घर देणे हेच उद्दिष्ट

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) सचिव विपिन पालीवाल यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, रहिवाशांचा हा वाढता प्रतिसाद म्हणजे या प्रकल्पासाठी अतिशय सकारात्मक संकेत आहे. चांगल्या घरांच्या अपेक्षेने आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धारावीतील अनेक कुटुंबे स्वतःहून पुढे येत आहेत. 

( नक्की वाचा : Dharavi News: 'मला नवीन घर कधी मिळणार?'; धारावीकरांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता थेट WhatsApp आणि कॉलवर! )

राहत्या घरचा ताबा सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नसते, याची पूर्ण जाणीव प्रशासनाला आहे. यासाठीच विशेष टीम स्थानिकांच्या मदतीसाठी तैनात ठेवण्यात आली असून ही प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धारावीतील प्रत्येक पात्र रहिवाशाला हक्काचे घर देणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पुनर्विकासासाठी घरे रिकामी करणाऱ्या कुटुंबांना 12 महिन्यांचे आगाऊ भाडे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून देण्यात येत आहे. याशिवाय रहिवाशांना 1 महिन्याचे अतिरिक्त भाडे (ब्रोकरेज) आणि स्थलांतरासाठी एकरकमी 5000 रुपये सहाय्यता निधी दिला जात आहे. आत्तापर्यंत एएनडीपीएलकडून 1700 हून अधिक डिमांड ड्राफ्ट्सचे वितरण करण्यात आले आहे. यापुढील घरभाडे थेट कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा केले जाणार असून, दरवर्षी या रक्कमेत 5% नी वाढ केली जाईल.

टप्प्याटप्प्याने होणार स्थलांतर

अनेक रहिवाशांकडून भाडेकरार आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात असून, स्थलांतराची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या स्थानिकांना दर्जेदार घरे, अद्ययावत पायाभूत सुविधा आणि सुरक्षित भविष्याची हमी देण्याचे ध्येय असून रहिवाशांच्या प्रतिसादामुळे या ध्येयाच्या जवळ जाण्यास मदत होत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com