रेवती हिंगवे, पुणे
केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यांच्या नावाची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. भाजप पक्षश्रेष्ठी मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातली धक्कातंत्राचा वापर करुन मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री बनवतील अशी चर्चा सुरु आहे. मात्र पुण्याचे खासदाराने मुरलीधर मोहोळ यांनी या चर्चा निराराधार आणि खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे शहरात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच दणदणीत विजय झाला. त्यानंतर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्रिपदी निवड होईल अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत म्हटलं की, "समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे."
(नक्की वाचा: वक्फ बोर्डाला 10 कोटी, 24 तासात निर्णय रद्द; देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण)
"आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे", असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं.