जाहिरात

बाईकवरुन जाताना एक चूक नडली अन् सतीशचं आयुष्यचं बदललं, हैराण करणारा VIDEO आला समोर

एक व्यक्ती दुचाकीवरुन हेल्मेट न घालता जलद गतीने जात होती. त्याचवेळी अचानक असं काही घडलं की त्याचं आयुष्यचं बदललं.

बाईकवरुन जाताना एक चूक नडली अन् सतीशचं आयुष्यचं बदललं, हैराण करणारा VIDEO आला समोर
  • बेंगलुरु में एक बाइक चालक सिर पर अचानक पेड़ की टहनी गिरने से बेहोश हो गया
  • बाइक चालक सड़क पर गिर पड़ा और उसे तुरंत अस्पताल ले जाया गया था. डॉक्टर ने कहा वह कोमा में है
  • स्थानीय लोगों की मदद से सतीश को मणिपाल अस्पताल में बेहतर इलाज के लिए भर्ती कराया गया

विना हेल्मेट वाहन चालवणं किती घातक असू शकतं हे बंगळुरूच्या घटनेवरून समोर आलं आहे. एक व्यक्ती दुचाकीवरुन हेल्मेट न घालता जलद गतीने जात होती. त्याचवेळी अचानक झाडाची वाळलेली फांदी तुटली आणि त्याच्या डोक्यावर पडली. फांदी डोक्यावर पडताच तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण बिघडलं आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे यातच तो कोमामध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे. हा तरुण कामावर निघाला होता, मात्र एका चुकीमुळे तो थेट रुग्णालयात पोहोचला. 

झाडाची फांदी कोसळल्याने थेट कोमामध्ये...

ही व्यक्ती दुचाकीवरुन कामाला जात होती. झाडाची फांदी डोक्यावर कोसळताच तो खाली कोसळला. यानंतर लोक धावत त्याच्या जवळ गेले. ते त्याला उठवण्याचा प्रयत्न करती होते. मात्र तो बेशुद्ध होता. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की तो कोमामध्ये गेला आहे. जर दुचाकी स्वाराने हेल्मेट घातलं असतं तर त्याच्यासोबत हे घडलं नसतं. 

नक्की वाचा - NEET मध्ये आलं अपयश, मग करियर बदलून वेगळचं क्षेत्र निवडलं; आता 20 व्या वर्षी 72.3 लाखांचं पॅकेज

बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला...

हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना बंगळुरूच्या राजाजीनगरच्या राम मंदिर रोडवर घडली. रस्त्याजवळील झाडाची वाळलेली फांदी अचानक खाली कोसळली. ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. हैराण करणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पीडित व्यक्तीचं नाव सतीश असून तो ५२ वर्षांचा आहे. तो कामावर जात असताना त्याच्यासोबत हा अपघात घडला. 

Latest and Breaking News on NDTV

कशी आहे सतीशची प्रकृती?

मिळालेल्या माहितीनुसार, सतीशवर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याला आपत्कालिन शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे. फांदी डोक्यावर कोसळताच तो कोमामध्ये गेला होता. हळूहळू तो त्यातून बाहेर येत असल्याचं सांगितलं जात आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com