Navi Mumbai: एका बाळाचा जन्म रस्त्यावर, दुसऱ्याची प्रसुती रिक्षात..डॉक्टरांनी कसे वाचवले जुळ्या पोरांचे प्राण?

Navi Mumbai Twin Baby Viral News :  तुर्भे परिसरात घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman Twins Baby Delivery
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Twin Baby Viral News :  तुर्भे परिसरात घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. डॉ. रविंद्र गोसावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे गर्भवती महिलेची प्रसुती यशस्वीरित्या पार पडली आणि तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. शबनम खान असं या महिलेचं नाव आहे. आठ महिन्यांच्या या गर्भवती महिलेला अचानक प्रसुती वेदना झाल्या. पहिल्या बाळाचा जन्म रस्त्यावरील अरुंद गल्लीत झाला. ज्यामुळे रक्त संसर्गाचा (सेप्सीमिया) मोठा धोका निर्माण झाला होता. पण सीनिअर जनरल प्रक्टिशनर डॉ. रवींद्र गोसावी यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन गर्भवती महिलेला धीर दिला आणि तिला रुग्णालयात दाखल केले.

डॉ. गोसावी ठरले खान कुटुंबीयांसाठी देवदूत?

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात जात असताना दुसऱ्या बाळाचा जन्म ऑटोरिक्षात झाला. या गंभीर परिस्थितीत डॉ. गोसावी यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही बाळांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यानंतर तिघांनाही एनएमएमसीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय कर्मचारी,निवासी डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ आणि डॉ. गजानन मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रुग्णांवर तातडीनं उपचार केले.

नक्की वाचा >> निवडणुकीपूर्वीच खळबळ! "तुझ्या बायकोचं नाव घेऊ सांगतो, मी तिकीट..", रावसाहेब दानवेंची ऑडिओ क्लिप व्हायरल!

याविषयी डॉ.रवींद्र गोसावी म्हणाले, “या आपत्कालीन प्रसंगी मी कोणतेही मानधन घेतले नाही. माझा एकमेव उद्देश आई आणि तिच्या दोन बाळांचे जीवन वाचवणे हा होता. डॉक्टर म्हणून हा माझा कर्तव्यभाव होता आणि माणूस म्हणून ही माझी सेवा होती.या घटनेमुळे तुर्भे परिसरातील रहिवासी, एनएमएमसीचे अधिकारी आणि शबनम खान यांच्या कुटुंबीयांनी डॉ. गोसावी यांचे मनःपूर्वक आभार मानले. शबनम यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं, “जर डॉ. गोसावी वेळेत आले नसते, तर आम्ही त्यांना गमावले असते. ते आमच्यासाठी देवदूत ठरले.”

नक्की वाचा >> बसमध्ये महिलेच्या गुप्तांगाला गुपचूप स्पर्श केला..महिलेनं व्हिडीओ काढून वासनांधाच्या कानाखाली जाळ काढला अन्..