जाहिरात

निवडणुकीपूर्वीच खळबळ! "तुझ्या बायकोचं नाव घेऊन सांगतो, मी तिकीट..", रावसाहेब दानवेंची ऑडिओ क्लिप व्हायरल!

Raosaheb Danve Audio Clip Viral : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर केलीय. अशातच रावसाहेब दानवे यांची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

निवडणुकीपूर्वीच खळबळ! "तुझ्या बायकोचं नाव घेऊन सांगतो, मी तिकीट..", रावसाहेब दानवेंची ऑडिओ क्लिप व्हायरल!
Raosaheb Danve Audio Clip Viral
मुंबई:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Raosaheb Danve Audio Clip Viral : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर केलीय. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीं 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. अशातच येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचांही बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात तसच शहरांमध्येही विविध पक्षांतील कार्यकर्ते मोर्चेबांधणी करत आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रस्सीखेंच सुरु आहे. अशातच भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि नेते रावसाहेब दानवे यांनी भाजप आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण वाघ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेमकं काय घडलंय?

लोकसभा निवडणुकी दरम्यान रोहिलागड विभागाचा प्रचार करत असताना रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मण वाघ यांना मोठं आश्वासन दिलं होतं. तू ओबीसी प्रमाण पत्र काढून ठेव, यावेळी तुझाच नंबर आहे, असं दानवे त्या कार्यकर्त्याला म्हणाले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे यांनी अवधूत नाना खडके यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याचं समजते.

नक्की वाचा >> Navi Mumbai Crime 83 कोटींच्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश,12 जणांना अटक, कोण आहे मुख्य सूत्रधार? डोंबिवलीतही...

त्यानंतर नाराज झालेल्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट रावसाहेब दानवे यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. "बूथ प्रमुख असताना तुम्ही शब्द दिला होता.जो मराठा समाजाचा आहे, त्याच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. अशा व्यक्तीला उमेदवारी देत आहेत", असं म्हणत वाघ यांनी दानवेंकडे नाराजी व्यक्त केली.दरम्यान, दानवे आणि वाघ यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

"तू चिंता करू नकोस, मला भेटायला ये.."

या ऑडिओ क्लिपमध्ये असं संभाषण आहे की, रावसाहेब दानवे लक्ष्मण वाघ यांना सांगतात की, तुला भांडायचय का.? तुझ्या बायकोच्या नाव घेऊन सांगतो, मी तिकीट वाटप करत नाही. मी नेता आहे ज्याला तिकीट मिळेल त्याच्या प्रचाराला येतो. तुला भेटलं तर तुझ्या प्रचाराला येतो. तू मला भेटायला ये, तू चिंता करू नको. मला भेटायला ये..कधी येतो सांग..यावर वाघ म्हणाले, असं नसत दादा मी तुमचा कार्यकर्ता आहे. मला तिकीट लागत नाही.मात्र ओबीसी समाजाची जागा असताना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या ओबीसी असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं जात आहे, असं म्हणत वाघ यांनी दानवेंवर नाराजीचा सूर आवळला आहे.

(एनडीटीव्ही मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com