Woman Physically Assaulted Viral Video : बसमध्ये महिलेच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. नराधम व्यक्तीने या महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श केला आणि त्यानंतर महिलेच्या छातीलाही टच करण्याचा प्रयत्न केला. वासनांध व्यक्तीने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झालाय. संतापलेल्या महिलेनं या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. या महिलेनं नराधमाच्या सपासप कानशिलात लगावल्या. या भंयकर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बसमध्ये बाजूच्या सीटवर बसलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडलीय. महिलेनं त्याने केलेल्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला आहे. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, बसमध्ये बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवासी महिलेसोबत या तरुणाने अश्लील कृत्य केलं. त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला आणि त्यानंतर छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान महिलेलं तरुणाच्या हालचालींबाबत कळतं आणि ती त्या वासनांध व्यक्तीच्या कानाखाली जाळ काढते.
नक्की वाचा >> 'या' देशातील महिला राष्ट्रपतींचा विनयभंग! छातीला स्पर्श, किस अन्..तरुणाचं संतापजनक कृत्य! Video व्हायरल
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले
बसच्या आतमध्ये बसलेला हा व्यक्ती महिलेच्या शेजारी बसलेला असतो आणि तो महिलेसोबत अत्यंत आक्षेपार्ह (आपत्तिजनक) कृत्य करत असतो. या महिलेनं तरुणाने केलेले अश्लील चाळे कॅमेरात कैद केले आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. हा व्हिडीओ @INDStoryS नावाच्या यूजरने एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, बेटी बचाव, बेटी पढाओ अशी घोषणा देणारे लोक आता कुठे गेले? केंद्र सरकारची ही योजना योग्य होती की चुकीची? आपल्या देशातील बहिणी कुठेही सुरक्षीत नाहीयत.
नक्की वाचा >> Diamond Crossing 4 दिशांनी ट्रेन सुसाट धावते, कधीच टक्कर होत नाही, महाराष्ट्रातील 'ते' एकमेव स्टेशन कोणते?
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
केरळच्या कट्टाकडा जिथे एक महिला बसमध्ये प्रवास करत होती. तेव्हा शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत छेडछाड केली. त्यानंतर त्या महिलेनं हिंमत दाखवून त्या व्यक्तीचा व्हिडीओ बनवला आणि लगेच त्याला थप्पड मारली. या घटनेचं गांभीर्य लक्षात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. ही पोस्ट शेअर करत पोलिसांनाही टॅग करण्यात आलं आहे. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world