जाहिरात

Dombivli News : डोंबिवली 65 बेकायदा इमारत प्रकरण; तहसीलदारांच्या चौकशी धक्कादायक माहिती उघड

Dombivli 65 illegal building case : काही दिवसांपूर्वी 65 बेकायदा इमारत प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन तक्रार केली होती.  

Dombivli News : डोंबिवली 65 बेकायदा इमारत प्रकरण; तहसीलदारांच्या चौकशी धक्कादायक माहिती उघड

अमजद खान, डोंबिवली

Dombivli 65 illegal building case : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांची देखील फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाले आहे. या प्रकरणी सखोल चौकशीनंतर इमारतीसाठी लागणारा सातबारा आणि नकाशे खोटे तयार केले होते हे समोर आले आहे. या प्रकरणात कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोंबिवलीतील रामनगर पोलिसांना सातबारा प्रकरणात बिल्डर आणि खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने याबाबत चौकशीची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना अटक होईल, अशी आशा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच प्रांत कार्यालयाचे देखील त्यांनी आभार मानले आहे.  

(नक्की वाचा- Dombivli '65 बेकायदा इमारतीमध्ये घोटाळा करणाऱ्याला पोलिसांचे संरक्षण', थेट आयुक्तांसमोरच गंभीर आरोप)

काही दिवसांपूर्वी 65 बेकायदा इमारत प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन तक्रार केली होती.  बेकायदा इमारतीच्या बांधकामाकरिता खोटे सातबारा आणि नकाशे वापरले गेले आहेत, या प्रकरणाची चौकशी करुन करावाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यानुसार प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले होते. या चौकशीअंती इमारतीसाठी वापरलेले जाणारे सातबारा आणि नकाशे खोटे आहेत ही बाब लक्षात आली. त्यानंतर तहसीलदार शेजाळ यांनी डोंबिवली रामनगर पोलिसांना पत्राद्वारे या संदर्भात त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

(नक्की वाचा- Dombivli News : डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींचं काय होणार? रहिवाशांसमोर कोणता पर्याय? बँंकीग तज्ज्ञांनी दिली माहिती)

ज्या प्रकरणात हे आदेश दिले गेले आहेत, त्या प्रकरणात खोटे सातबारा आणि नकाशे साई डेव्हलपर्स यांचे बिल्डर शालिक भगत आणि त्यांचे साथीदार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करुन पुढील तपास करणार आहेत. बिल्डरांसोबत खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या लवकरच अटक होईल, अशी अपेक्ष दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: