डोंबिवलीत एका नामांकित हॉस्पिटलच्या बड्या डॉक्टरने प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच हॉस्पिटलमधील नर्सने बोलणे बंद केल्याच्या नैराश्यातून या डॉक्टरने 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या घेऊन जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला.
'त्या' एका नर्ससाठी सुखी संसाराचा त्याग
या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे स्वतःचे नामांकित हॉस्पिटल आहे. संबंधित डॉक्टरचे त्यांच्याच हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पत्नीसोबतच्या वादामुळे डॉक्टरांनी डोंबिवली पूर्वेतील एका हायफाय सोसायटीत स्वतंत्र घर घेतले आणि तिथे राहू लागले.
(नक्की वाचा- Actress Arrested: ग्लॅमरच्या आड काळा धंदा! सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक)
लग्नाचा तगादा आणि टोकाचा निर्णय
घटनेचा पेच तेव्हा वाढला जेव्हा संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नाचा हट्ट धरला. "माझे आधीच लग्न झाले आहे, मी तुझ्याशी लग्न कसे करू?" असे डॉक्टरांनी सांगितल्यावर संतापलेल्या नर्सने डॉक्टरांशी बोलणे पूर्णपणे बंद केले. ज्या नर्ससाठी घर सोडले तिनेच अबोला धरल्याने डॉक्टर प्रचंड व्यथित झाले. याच मानसिक तणावातून त्यांनी राहत्या घरी 10 बिअर प्यायल्या आणि 45 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या.
(नक्की वाचा- Exclusive VIDEO: समृद्धी महामार्गावर मृत्यूचा खेळ! स्थानिकांच्या आणि मुलांच्या कृतीमुळे मोठ्या अपघाताचा धोका)
वेळीच उपचार मिळाल्याने वाचले प्राण
डॉक्टर वेळेवर हॉस्पिटलमध्ये न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. दरवाजा उघडल्यावर डॉक्टर बेशुद्धावस्थेत खाली पडलेले आढळले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुदैवाने, सध्या डॉक्टरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता विष्णूनगर पोलीस करत आहेत.