जाहिरात

Actress Arrested: ग्लॅमरच्या आड काळा धंदा! सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक

Actress Arrested: ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला. यात हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला दलाल म्हणून काम करताना अटक करण्यात आली आहे.

Actress Arrested: ग्लॅमरच्या आड काळा धंदा! सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात एका नामांकित हॉटेलमधून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. शनिवारी गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 26 वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे, जी हिंदी वेब सिरीजमध्ये काम करते. ही अभिनेत्री इतर महिलांना या व्यवसायात ओढून दलाल म्हणून काम करत होती.

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून 'डील'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप कॉल्सचा वापर करत असे. टीव्ही कलाकार आणि उदयोन्मुख अभिनेत्री पुरवण्यासाठी ती ग्राहकांकडून 25 हजार रुपयांची मागणी करत असे. प्रत्येक व्यवहारातून ती स्वतःकडे 15 हजार रुपये कमीशन म्हणून ठेवून उर्वरित रक्कम पीडित महिलांना देत असे.

(नक्की वाचा-  Exclusive VIDEO: समृद्धी महामार्गावर मृत्यूचा खेळ! स्थानिकांच्या आणि मुलांच्या कृतीमुळे मोठ्या अपघाताचा धोका)

दोन महिलांची सुटका

पोलिसांनी हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात 40 आणि 48 वर्षे वयोगटातील दोन महिलांची सुटका केली आहे. या महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात आणले गेले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मोबाईल फोनसह 11,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा-  Pune Traffic News: गुगल मॅप्सच्या मदतीने पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल)

आर्थिक विवंचनेतून गुन्हेगारीकडे वळली

अटक करण्यात आलेली अभिनेत्री मूळची बिहारची असून ती सध्या मुंबईतील मालाड परिसरात राहत होती. तिने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनय क्षेत्रात नियमित काम मिळत नसल्याने ती आर्थिक अडचणीत होती. बिहारमधील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने या अवैध व्यवसायाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले.

या कारवाईमुळे ठाणे आणि मुंबईतील अभिनय क्षेत्राशी निगडित असलेल्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वागळे इस्टेट पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून, याचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचले आहेत का, याचा शोध घेत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com