जाहिरात

Viral Video: "बाजूला सरक..." म्हटल्याने पारा चढला; डोंबिवली लोकलमध्ये महिलांचा फ्री-स्टाईल राडा!

Viral Video: ठाण्याहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाला. गर्दीत "बाजूला सरक" म्हटल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेने दुसऱ्या महिलेला बेदम मारहाण केली.

Viral Video: "बाजूला सरक..." म्हटल्याने पारा चढला; डोंबिवली लोकलमध्ये महिलांचा फ्री-स्टाईल राडा!

Mumbai Local Train Viral Video: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे आता नेहमीचंच झालं आहे.. गुरुवारी ठाणे ते डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान आसनगाव लोकलमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने पसरत आहे.

वादाचे नेमके कारण काय?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी घडली. आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. यावेळी एका महिला प्रवाशाने दुसऱ्या महिलेला "बाजूला सरक" किंवा "जागा द्या" असे म्हटले. या साध्या बोलण्यावरून समोरच्या महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

VIDEO

(नक्की वाचा-  Dharashiv News: तहसीलदारांना मुलीसमोरच गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी; परंडा तहसील कार्यालयातील प्रकार)

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या महिलेने दुसऱ्या महिलेचे केस ओढून तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतर महिला प्रवाशांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र मारहाण करणारी महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

(नक्की वाचा-  Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक)

रेल्वे पोलिसात तक्रार

ट्रेनमधील इतर प्रवाशांनी या संपूर्ण राड्याचे चित्रीकरण केले, जे आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पीडित महिलेने याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस व्हायरल व्हिडिओच्या आधारे महिलेचा शोध घेत आहेत. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com