जाहिरात

Hindi Imposition : ... तर दादा भुसे राजीनामा देतील का? डोंबिवलीच्या शिक्षकांचा थेट मंत्र्यांनाच सवाल! पाहा Video

Hindi Language Row : नव्या शैक्षणिक धोरणातील तिसऱ्या भाषा विषयावरून राज्यात सध्या वाद सुरु आहे.

Hindi Imposition : ... तर दादा भुसे राजीनामा देतील का? डोंबिवलीच्या शिक्षकांचा थेट मंत्र्यांनाच सवाल! पाहा Video
Dombivli Video : नाराज शिक्षकांनी थेट शिक्षणमंत्र्यांनाच सवाल केला आहे.
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

Hindi Language Row : नव्या शैक्षणिक धोरणातील तिसऱ्या भाषा विषयावरून राज्यात सध्या वाद सुरु आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय जोरदार विरोधानंतर बदलण्यात आला. त्यानंतर हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या ऐवजी सर्वसाधारण तृतीय भाषा करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला शिक्षकांकडूनच विरोध होत आहे. डोंबिवलीतल्या एका शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शिक्षकांनीच या निर्णयाला विरोध केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे व्हिडिओ? 

व्हायरल व्हिडीओमध्ये मनसे पदाधिकारी प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना पत्र देत आहेत. तिसरी भाषा म्हणजे हिंदी शिकवू नका. दरम्यान डोंबिवली मनसेच्या पदाधिकारी यांचा पत्र देतानाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये सरकारचा निर्णय योग्य नाही, हे शिक्षकच सांगताना दिसत आहेत. 

लहान मुलांची तीन भाषा शिकण्याची मानसिकता नसते. कुठले शिक्षक तज्ञ आहेत की जे अशा भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करतात. महाराष्ट्रात तीन भाषा असतील तर उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या तीन भाषा शिकवतात? असा सवाल शिक्षकांनी केला आहे. 

( नक्की वाचा : Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश )
 

20 पालक तयार असतील दुसरी भाषा शिकवावी, असे निर्देश सरकारनं दिले आहेत. त्यावर 20 पालकांनी राजीनामा मागितला, तर शिक्षण मंत्री दादा भुसे राजीनामा देणार का ?  असा सवाल शिक्षकानी उपस्थित केला आहे.  या शिक्षकांनी सांगितले की, शिक्षणातील संकल्पना या मातृभाषेतून जितक्या समजतात तितक्या इतर भाषा शिकून होत नाही. मूळात पुस्तके उपलब्ध होत नाहीत. आम्ही सूद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतून पाटी घेऊन शिकलो. आमचा अभ्यास सुद्धा पाटीवरच झाला. भाषेची सक्ती गुजरातमध्ये केलेली नाही. इंग्रजी आणि हिंदी भाषा ही पाचवीपासून शिकविली गेली. मग आत्ता त्याची शक्ती का ? असा प्रश्न शिक्षकांनी विचारला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com