जाहिरात

December 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेचे शुटींग कुणी केले? 'या' अवलियामुळे ते शक्य झाले

कोट्यवधींच्या जनसमुदायाची चित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपणारा ते एकमेव अवलिया होते.

December 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेचे शुटींग कुणी केले? 'या' अवलियामुळे ते शक्य झाले
मुंबई:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. यावेळी देशभरातून त्यांचे अनुयायी लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते.त्याची दृष्य फोटो आजही आपण पाहातो. पण हा ऐतिहासिक ठेवा देण्या मागे एक अवलिया होता. काळानुसार तोही पडद्याड गेला. पण त्याने दिलेला चित्रिकरणा रूपी ठेवा आजही आजच्या पिढीला पाहाता येतोय. या चित्रिकरणासाठी त्या व्यक्तीची निष्ठा, त्याग आणि बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेलं नितांत प्रेम दिसून येतं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने याचाच आढावा आपण घेणार आहोत. 

ज्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचे शुटींग केलं त्याचं नावी नामदेव व्हटकर असे आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण महायात्रेच्या दुर्मिळ चित्रीकरणातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. याची माहिती नामदेव व्हटकर यांना मिळाली. व्हटकर यांना या घटनेचे चित्रीकरण करण्याची तीव्र इच्छा होती. परंतु त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी कॅमेरा खरेदी करण्यासाठी आणि चित्रपटाची रील तयार करण्यासाठी आपला छापखाना  म्हणजेच प्रिंटिंग प्रेस गहाण ठेवला. नंतर स्वतःचे कोल्हापुरातील घरही विकले होते. त्यानंतर त्यांनी या महापरिनिर्वाणाचे  केवळ 3,500 फूट इतके हे चित्रीकरण त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत केली. 

नक्की वाचा - Toll Tax Relief: टोल बाबत नितीन गडकरींनी संसदेत दिली 'गुड न्यूज' म्हणाले आता 1 वर्षात देशात टोल...'

यासाठी त्यांनी स्वतःचा सर्व संसार पणाला लावला होता. व्हटकर यांनी नंतर 'महापुरुष डॉ. आंबेडकर'1968 नावाचा एक लघुचित्रपट (Short Film) दिग्दर्शित केला होता. यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांसह त्यांच्या महापरिनिर्वाण यात्रेच्या दृश्यांचा समावेश होता. हा दुर्मिळ ठेवा त्यांनी नंतर सरकारकडे जमा केला होता. त्यांच्या या त्यागी कार्यामुळेच आज आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणांचे जिवंत दृश्य पाहता येते. नामदेव व्हटकर हे खऱ्या अर्थाने या महत्त्वाच्या क्षणांचे अनामिक नायक आहेत.नामदेव व्हटकर यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.चित्रपटाचे नाव 'परिनिर्वाण' (Parinirvaan) किंवा 'महापरिनिर्वाण: एक कथा, दोन इतिहास' (Mahaparinirvan: Ek Katha, Don Itihas) असं आहे.  

नक्की वाचा - Trending News: फुकट इंटरनेटचा धमाका! 'ही' आहे महाराष्ट्रातील पहिली फ्री WiFi देणारी महापालिका

हा चित्रपट थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर नसून, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे चित्रीकरण करणाऱ्या नामदेव व्हटकर यांच्या संघर्षमय आयुष्यावर आधारित आहे. नामदेव व्हटकर यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक करत आहेत. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी मुंबईत जो प्रचंड जनसमुदाय लोटला होता. त्या जनसागराचे आणि अखेरच्या प्रवासाचे दुर्मिळ चित्रीकरण व्हटकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. एका महामानवाला निरोप देण्यासाठी जमलेल्या कोट्यवधींच्या जनसमुदायाची चित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपणारा ते एकमेव अवलिया होते. त्यांच्याकडेच या महायात्रेचे मूळ आणि दुर्मिळ फुटेज उपलब्ध आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com