निनाद करमरकर, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये एका वाहतूक पोलिसाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाजवळ हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक रिक्षाचालक कॅम्प 3 मधील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळून येत होता. यावेळी त्याच्या रिक्षाने एका तरुणीला धडक दिली. या घटनेनंतर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडलं, मात्र तो रिक्षा पळून गेला.
(नक्की वाचा - शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप)
रिक्षाचालक काही वेळाने आपली रिक्षा घेण्यासाटी पुन्हा आला. यावेळी वाहतूक पोलीस आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. यावेळी रिक्षाचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा : अभिनेत्रीला अश्लील फोटो, नाल्यात मृतदेह आणि स्टारला अटक! मर्डर मिस्ट्रीचं रहस्य काय? )
वाहतूक पोलिसासोबत असलेल्या इतरांना दोघांना विरोध केला. मात्र दोघांचीही पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी सुरुच होती. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये तिथे उपस्थित असलेल्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. या मारहाण करणाऱ्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world