जाहिरात
This Article is From Sep 06, 2024

Shilpa Shinde : शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप

शिल्पा शिंदेने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला ऑडिशनमध्ये चित्रपट निर्मात्याला आकर्षित करण्यास सांगितले होते.

Shilpa Shinde : शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप
Image was shared on Instagram.
New Delhi:

'अंगूरी भाभी' या व्यक्तिरेखेने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. याच स्वभावामुळे शिल्पा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  शिल्पाने सिनेसृष्टीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. एका हिंदी चित्रपट निर्मात्याने माझ्यावर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिल्पा शिंदेने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला ऑडिशनमध्ये चित्रपट निर्मात्याला आकर्षित करण्यास सांगितले होते. तिला ठराविक कपडे घालण्याची आणि चित्रपट निर्मात्याला भुरळ पाडण्यासाठी एक सीन करण्याची सूचना देण्यात आली होती. शिल्पाने म्हटलं की, त्या व्यक्तीने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी खूप घाबरले होता. मी त्याला ढकलून बाहेर पळत सुटले.

(नक्की वाचा- सुपरस्टार बनला व्हिलन, 'प्रायव्हेट पार्ट' ला विजेचे झटके देऊन केली फॅनची हत्या)

मी घाबलेली असताना सुरक्षारक्षकांना काय घडले याचा अंदाज आला. त्यांनी देखील मला ताबडतोब निघून जाण्यास सांगितले, असं शिल्पा शिंदेने सांगितले. शिल्पाने आरोप करताना निर्मात्याची ओळख उघड न करण्याची भूमिका घेतली. आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना तिने म्हटलं की, चित्रपट निर्माता हिंदी चित्रपटसृष्टीतला होता. मी हा सीन करायला होकार दिला कारण तो देखील एक अभिनेता देखील होता.

( नक्की वाचा : अभिनेत्रीला अश्लील फोटो, नाल्यात मृतदेह आणि स्टारला अटक! मर्डर मिस्ट्रीचं रहस्य काय? )

शिल्पा पुढे म्हणाली की, 'मी खोटे बोलत नाही, पण मी त्याचे नाव घेऊ शकत नाही. त्या निर्मात्याची मुले माझ्यापेक्षा थोडेच लहान असतील. मी निर्मात्याचं नाव घेतल तर  त्यांनाही वाईट वाटेल. काही वर्षांनी मी त्याच निर्मात्याला पुन्हा भेटले होते, त्यावेळी तो माझ्याशी प्रेमाने बोलला होता. कदाचित त्याने मला ओळखले नाही आणि मला चित्रपटात भूमिकाही ऑफर देखील केली. मी ती ऑफर देखील नाकारली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: