Mumbai Crime: Instagram वरील मैत्री नडली; ब्लॅकमेलिंगमुळे CA तरुणाने आयुष्य संपवलं

सीएच्या आत्महत्येप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि खंडणी आकारणे असे गुन्हे दाखल केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : मुंबईतील 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने 2.5 कोटी रुपये खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर दोन व्यक्तींशी मैत्री झाल्यानंतर त्याला त्यांच्याकडून धमक्या येऊ लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, या चार्टर्ड अकाउंटंटने इन्स्टाग्रामवर काही जणांशी मैत्री केली होती. त्यानंतर, या दोघांनी त्याचे खाजगी व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. अनेक महिन्यांपासून तो त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पैसे देत होता. कंपनीच्या खात्यातूनही तो पैसे वळवत होता. त्याने एकूण 2.5 कोटी रुपये या ब्लॅकमेल करणाऱ्यांना दिले होते.

(नक्की वाचा- Mumbai Police : मोबाइल चोरीचा आरोप, शेफची पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या; अनेक सवाल अनुत्तरित...)

सीएच्या आत्महत्येप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि खंडणी आकारणे असे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आत्महत्येपूर्वी, या CA ने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

सीएच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईला तीन सुसाइड नोट्स मिळाल्या. एक आईसाठी, एक कंपनीसाठी आणि तिसरी नोट त्या दोन संशयितांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरणारी होती. पोलिसांनी कंपनीच्या खात्यातून कथितपणे काढलेल्या पैशांची चौकशी सुरू केली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - Juvenile Detention Centre : छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधारगृहातून का गायब होत आहेत मुली? धक्कादायक कारण आलं समोर)

पीडित तरुणाच्या आईने पोलिसांना सांगितले की, 7 जून रोजी संशयित त्यांच्या घरी आले होते. त्यांनी त्याच्यासोबतचे संबंध सार्वजनिक करण्याची आणि खाजगी व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तो प्रचंड निराश झाला होता. कारण त्याने यापूर्वीच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे.

Topics mentioned in this article