जाहिरात

Juvenile Detention Centre : छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधारगृहातून का गायब होत आहेत मुली? धक्कादायक कारण आलं समोर

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar News) विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

Juvenile Detention Centre : छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधारगृहातून का गायब होत आहेत मुली? धक्कादायक कारण आलं समोर

संभाजीनगरमधील बालसुधारगृहातील (Juvenile reformatory in Chhatrapati Sambhajinagar) मुलींनी पळ काढण्यामागचं कारण समोर, पोट दुखत असल्याने गरोदरपणाची चाचणी, तर बऱ्या न झाल्यास पवित्र पाणी शिंपडत असल्याचा जबाब

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar News) विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी मुलींना पकडून पुन्हा बालसुधारगृहाच्या ताब्यात दिले. तर काहींना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. पुढे प्रकरण अधिवेशनात देखील गेलं. मात्र, या मुली बालसुधारगृहातून नेमक्या का पाळल्या याचा शोध NDTV मराठीने घेतला असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pune News : 'तो कुरियवाला नाही तर बॉयफ्रेंड' त्या दिवशी बिनसलं म्हणून... कोंढवा प्रकरणात जबरदस्त ट्विस्ट

नक्की वाचा - Pune News : 'तो कुरियवाला नाही तर बॉयफ्रेंड' त्या दिवशी बिनसलं म्हणून... कोंढवा प्रकरणात जबरदस्त ट्विस्ट

या बालसुधारगृहात मुलींसोबत जे काही घडत होते ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाते. बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जायचा.

विशेष म्हणजे या सर्व आरोपांचा खुलासा सामजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी केला आहे. मुलींचा बालकल्याण समितीपुढे जेव्हा जबाब घेण्यात आला त्यावेळी आपण तिथे उपस्थितीत होतो आणि आपल्या समोरच मुलींनी आपली आपबीती सांगितली असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com