सूरज कसबे, पुणे
Pune News: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून महाराष्ट्र अजून सावरलाही नाही. मात्र त्याचवेळी पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय समोर आला. 15 तारखेला पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. महापालिकेच्या या निर्णयानंतर प्रशासनावर चौफेर टीका झाला. यानंतर अखेर महापालिकेने आपला निर्णय मागे घेत सर्व कार्यक्रम रद्द केले.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
पुणे महानगरपालिकेने आगामी पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वैयक्तिक आणि समूहनृत्य, नाटक, हिंदी आणि मराठी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे अजित पवार ज्या पुण्याचे पालकमंत्री होते, त्याच पुणे महानगरपालिकेने अशी असंवेदनशिलता दाखवावी.
(नक्की वाचा- 'दादांच्या पायातून धुर येत होता, एक जण खाली उतरत होता' काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' प्रसंग)
चौफेर टीकेनंतर निर्णय मागे
महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क उपायुक्त तुषार बाबर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली आहे. सन्माननीय अजितदादा पवार यांचे निधन ही राज्याची मोठी हानी आहे. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी महापालिकेचे सर्व सार्वजनिक उत्सव व सांस्कृतिक सोहळे स्थगित करण्यात येत आहेत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिक आणि संबंधित संस्थांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Expressway वर 3 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत रागा, प्रवासी हैराण!)
15 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन होता. या वर्धापन दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनावरती मोठ्या प्रमाणावर ती टीका करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने हे पत्रक काढून निर्णय मागे घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world